राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत 10:20:30 आश्वासित प्रगती योजना बाबत ashwasit pragati yojna 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत 10:20:30 आश्वासित प्रगती योजना बाबत ashwasit pragati yojna 

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणे तसेच सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दि.०२.०३.२०१९ रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत…..

दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत या विभागाच्या उपरोक्त विषयावर मा. मंत्रीमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

१. वित्त विभागाच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दि.०१.१०.२००६ पासून लाभ देतांना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे.

२. वित्त विभागाच्या दि.०२.०३.२०१९ शासन निर्णयानुसार तीन लाभाच्या (१०:२०:३०) सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दि.०१.०१.२०१६ पासून लाभ देतांना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे.

या निर्णयामुळे अंदाजे रु.२२,७९,०९,११६/- (रुपये बावीस कोटी एकोणऐंशी लक्ष नऊ हजार एकशेसोळा) इतका अनावर्ती खर्च आणि अंदाजे रु.३,६१,९२,०००/- (रुपये तीन कोटी एकसष्ट लक्ष ब्याण्णव हजार) इतका वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित आहे.

वित्त विभागाचे शुद्धिपत्रक pdf येथे पहा 👉pdf download 

16 thoughts on “राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत 10:20:30 आश्वासित प्रगती योजना बाबत ashwasit pragati yojna ”

  1. मी 31 मे 2020 ला सेवानिवृत्त झालो शासन निर्णयानुसार मला 10.20.30. चे फायदे व फरकाची रक्कम मिळेल अशी धारणा आहे पंरतू सार्वजनिक बांधकाम मंडळ नासिक यानी सेवानिवृत्त चा काहीच विचार करत नाही तरी आपल्या स्तरावर आदेश द्यावेत विनंतीस

  2. मागील वेळेस पण जे ज्युनिअर पी.टी.सी. होते. अन् ट्रेन होते त्या लोकांचे रिटायर होताना खुप नुकसान झाले होते. १० .२० .३० चा टप्पा लागू केल्यास अशा लोकांचा नक्कीच फायदा होईल. नक्कीच लागु करण्यात यावी. काही लोकांची सेवा जास्त असुनही त्यांना बी. ए. नसल्यामुळे वेतनश्रेणी लागू होत नाही.

  3. मी 31/01/2023 ला सेवानिवृत्त झालो त्या अंतर्गत मला 10/20/30 चा तिसरा लाभ मीळणे अपेक्षित होते परंतू वर्ग ४ मधुन वर्ग ३ मध्ये पदोन्नती झाल्यामुळे आणी सेवानिवृत्तपुर्वी २ पदोन्नती व या योजनेअंतर्गत २ लाभ मीळाल्यामुळे ३ रा लाभ देता येणार नाही असे कौशल्य विकास विभागाने कळविले आहे.मला शासन निर्णयानुसार ३ रा लाभ मिळणे अपेक्षित आहे.तरी आपल्या स्तरावरुन योग्य मार्गदर्शन व्हावे

  4. मी पोलीस खात्या मधून 31/5/2021 रोजी सेवानिवृत्त झालो आहे. पोलीस खात्या मध्ये पोलीस शिपाई ‘पोलीस नाईक ‘पोलीस हवालदार ‘ सहायक फौंजदार अशी पदोन्नती आहे. सन 2022 मध्ये अचानक पोलीस नाईक पद रद्द केले आहे. त्यामुळे मला पोलीस उप निरीक्षक म्हणून पदोन्नती आस्वाशीत प्रगती योजने प्रमाणे मिळेल काय व त्या प्रमाणे फरक मिळेल काय?

  5. एकाकी पदासाठी आश्वासित प्रगती योजनेसाठी काय लाभ मिळेल

  6. मी 31/7/2023 रोजी निवृत्त झालो
    काय कारवाई करावी

  7. 2014 पासून दुसरा लाभ मंजूर करण्यात आला. परंतु 10,20,30 योजना 2016 पासून सुरु झाल्याने प्रत्यक्ष लाभ जानेवारी 2016 पासून दिला.
    वेतन निश्चित करताना 2400 ग्रेड प्रमाणे निश्चित करून एस 13 मध्ये फिक्स केले.
    माझे मते 2400 ग्रेड प्रमाणे न करता 4200 ग्रेड pay प्रमाणे फिक्ससेशन करणे योग्य होत.
    तर दुसरा ला मंजूर झाल्यावर वेतन निश्चिती 2400 ने का 4200 ने करावी याबाबत कृपया कळववे.

  8. माझी नियुक्ती जानेवारी 1992 ची ahe मला याच पदावर 2 लाभ मिळाले तिसरा लाभ 2022 मध्ये मिळणार होता फक्त 1 वर्ष बाकी होते तत्पूर्वीच 2021 मध्ये पदोन्नती दिली त्यामुळे मी class 1 च्या ग्रेड पे मध्ये आलो नाही याबाबत काय करावे लागेल

  9. माझा दुसरा लाभ 2023 ऑगस्ट ला मिळणार होता परंतु 28 दिसेम्बर 2023 ला उच्च लिपिक पदावर पदोन्नती दिली त्यामुळे मला पुढील वर्ग 2 पदाच्या वेतनश्रेणी पासून वंचीत रहावे लागत आहे माझी कनिष्ठ लिपिक पदाची नियुक्ती 1999 ऑगस्ट ची आहे।

  10. जि.प.शिक्षक,अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळेल का?

  11. After 12 yes GP 2400 converted in to GP 4200 plz activate maharashtra gov GR for University Lab Assistant post

  12. सर,मी ३० जून २०२१ रोजी कौशल्वायविभाग मधून सेवानिवृत्त झालो.मला फक्त एकच म्हणजे १२ वर्षांची १९९९ ला वाढ मिळाली. नंतर काही नाही.

  13. सर मी नगर परिषद मध्ये राज्य सेवा स्वर्ग कर्मचारी है मला सेवेत 24 वर्ष झाली पण कालबद्ध पदोन्नती किवा 10,20,30 चा लाभ अजून मिळाला नाही. कारण 10,20,30 चा jr नगर परिषद कर्मचारी याना लागु नाही म्हणतात असे नगर परिषद प्रशासन संचालक मुंबई यांचे आदेश हवे म्हणतात. कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती

Leave a Comment