अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीबाबत शासन निर्णय anganvadi sevika rules and regulations 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीबाबत शासन निर्णय anganvadi sevika rules and regulations 

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत

प्रस्तावना:-

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत्त योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाडयांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचा यांच्या नियुक्तीसंदर्भातील अटी शर्ती संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक ०२.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आल्या आहेत. तदनंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तींमध्ये संदर्भाधीन क्र. २ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयांन्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळसेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०२३ मधील परिशिष्ट “अ” नुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती. त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळसेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक ०२.०२.२०२३ शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळसेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणांव्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती ह्या संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक ०२.०२.२०२३ व तदनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील.

३. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळसेवेने पदभरतीस संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन पत्र दिनांक ०९.०९.२०२४ अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार अंगणवाडी

सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही

करण्यात यावी.

४. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमधील ज्या प्रकल्पांमध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषांनुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत, त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे, अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०१३०१२३४२७१९३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now