जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत apsi antar jilhabadli shasan nirnay 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत apsi antar jilhabadli shasan nirnay 

वाचा –१) शासन परिपत्रक, ग्रामविकास विभाग, क्रमांक आंजिब-०७११/प्र.क्र.११३/११/आस्था-७दिनांक-२९ सप्टेंबर, २०११

२) शासन शुध्दीपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक अजिब ४९१८/प्र.क्र.३९०/ आस्था-७, दिनांक-७ सप्टेंबर, २०१८

शासन परिपत्रक

राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सेवाभरती महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ नुसार केली जाते. जिल्हा परिषद सेवेत आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला दुसऱ्या जिल्हा परिषद सेवेत जावयाचे असल्यास, वरील सेवाप्रवेश नियमाच्या ८ मधील तरतूद नुसार कार्यवाही केली जाते. सदर नियम पाहता असे दिसून येते की, सेवाप्रवेश नियमानुसार आंतरजिल्हा बदली करताना, ज्या जिल्हा परिषदेत संबंधित कर्मचाऱ्यांची बदली करावयाची आहे, तो कर्मचारी धारण करित असलेल्या संवर्गाचे व प्रवर्गाचे सरळसेवेचे पद रिक्त असणे गरजेचे आहे. तो कर्मचारी सध्या ज्या पदावर काम करित आहे. त्या पदावर कसा पदास्थापित झालेला आहे, ही बाब येथे विचारात घेणे गरजेचे नाही. काही जिल्हा परिषदांमध्ये एखादा कर्मचारी धारण करित असलेल्या संवर्गाचे व प्रवर्गाचे पद बदलीने जाणाऱ्या जिल्हयात रिक्त असतानाही, संबंधित कर्मचारी हा सद्याच्या पदावर पदोन्नतीने पदस्थापित झाला आहे, या कारणाने त्या कर्मचाऱ्याची संबंधित जिल्ह्याच्या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदली करताना अडवणूक केली जाते.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील नियम क्रमांक ८ पुढील प्रमाणे आहेत :-

या नियमात काहीही अंतर्भुत असले तरी, अन्य जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवेतील कोणत्याही सदस्याने अर्ज केल्यानंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये परस्पर संमत करण्यात येतील. अशा शर्तीवर व अटींवर आणि पुढील आणखी शर्तीस अधिन राहून, अशा सदस्यांची उक्त जिल्हा परिषदांमध्ये खालील ज्या जिल्हा सेवेत त्यांने जे पद धारण केले असेल त्या जिल्हा सेवेतील पदावर नेमणूक करू शकते.

(एक) केवळ बढती देऊन भरण्यात येणाऱ्या पदावर अशा नेमणूका करण्यात येणार नाहीत आणि त्या नामनिर्देशन करून नेमणूक करण्यासाठी ज्या रिकाम्या जागा राखून ठेवण्यात आलेल्या असतील, त्या रिकाम्या जागांवर करण्यात येतील.

(दो)

आपसांत (परस्पर) बदलीने अशी नेमणूक झाल्यास अशा नेमणूक झालेली व्यक्ती आपल्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठता कायम ठेवील किंवा ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पदावर परस्पर बदलीद्वारे नेमणूक झाली असेल त्या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता या दोन्हीपैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता स्वीकारेल.

(तीन)

2

कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून अशी नेमणूक झाल्यास किंवा अशा नेमणूक झालेल्या व्यक्तींची त्या संवर्गातील सेवाज्येष्ठतानंतरच्या जिल्हा परिषदेमध्ये अशी नियुक्ती ज्या तारखेस झाली असेल, त्या तारखेपासून राहील.

वरील तरतूद विचारात घेता आंतरजिल्हा बदली प्रकरणात सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

१.. महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील नियम क्रमांक ८ मधील तरतूदीनुसार कर्मचाऱ्याची आंतरजिल्हा बदली तो धारण करित असलेल्या संवर्गाचे व प्रवर्गाचे पद बदलीने जाणाऱ्या जिल्हयात रिक्त असल्यास, अन्य तरतूदींचा भंग होत नसल्यास, अशा कर्मचाऱ्याची आंतरजिल्हा बदली होवू शकते.

२. अशी बदली करताना, संबंधित कर्मचारी सध्या धारण करित असलेल्या पदावर कशापध्दतीने (सरळसेवेने/पदोन्नतीने) पदस्थापित झाले आहे, ही बाब तपासण्याची आवश्यकता नाही.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१९०१२८१३१२२६०९२० हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Join Now