‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेची सोडत सोमवारी काढण्यात येणार RTE अंतर्गत 25% मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू right to education process start on monday
पुणे, ता. ७ : शिक्षण हक्क कायदा अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांमधून प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) सोमवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे काढण्यात येणार आहे.
‘आरटीई’ प्रवेशअंतर्गत अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. ०२ फेब्रुवारीपर्यंत असलेल्या या मुदतीदरम्यान राज्यातील एक लाख जागांसाठी तब्बल तीन लाख पाच हजार अर्ज आले आहेत. यात सर्वाधिक ६१ हजार अर्ज पुणे जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. या
सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांस ऑनलाईन उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.
दरम्यान, यंदा राज्यभरातील आठ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी एक लाख नऊ हजार १११ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी अर्ज दाखल करणाची प्रक्रिया १४ जानेवारीला सुरू करण्यात आली. यासाठी २७ जानेवारीपर्यंत मुदत होती. मात्र, नंतर ही मुदत ०२ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. या मुदतीत तीन लाख पाच हजार अर्ज दाखल झाले आहेत.