प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेस स्थगिती ; माननीय उच्च न्यायालय यांचे आदेश samayojan process stay
शिक्षक उत्कर्ष समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद( प्राथमिक विभाग) चे जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ व महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समिती चे राज्यअध्यक्ष अरुण जाधव यांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी समायोजन प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली होती .
दिनांक पाच 5 फेब्रुवारी 2025 रोजी या याचिकेवर सुनावणी होऊन माननीय न्यायाल यांनी खालील मुद्द्याच्या आधारे समायोजन प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.
1) पदोन्नती प्रक्रिया पूर्ण ने केल्यामुळे सर्वप्रथम केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यात यावी व नंतर समायोजन करण्यात यावे
2 सदरील समायोजन हे 2023 च्या संचमान्यतेनुसार असल्यामुळे आज रोजीच्या विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा वर याचा परिणाम होऊन संबंधित शाळेची पटसंख्या असूनही शिक्षकांची पदे अतिरिक्त झाली होती. समायोजन प्रक्रिया ही
त्याच शैक्षणिक वर्षांमध्ये होणे आवश्यक आहे.
शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करणे संबंधी माननीय उच्च न्यायालयाचे आदेश !
3)समायोजन प्रक्रिया ही दिनांक 30 नोव्हेंबर रोजी पर्यंतच होणे आवश्यक आहे.
परंतु आज रोजी फेब्रुवारी महिना असल्यामुळे व विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा महिना असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते असे निरीक्षण माननीय न्यायालयाने नोंदवून ही स्थगिती दिली आहे.
या समायोजन प्रक्रियेतून अनेक शिक्षकांना तालुक्याबाहेर व काही शिक्षकांना जिल्हा बाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती .यामुळे अनेक शिक्षकावर अन्याय होणार होता हा अन्याय माननीय उच्च न्यायालयांनी दूर केला आहे
याबद्दल उच्च न्यायालयांचे शतशः आभार
सदरील याचिकेमध्ये उच्च न्यायालयाचे विधीतज्ञ मा हरीशजी बळी साहेब यांनी युक्तिवाद करून हा न्याय दिल्याबद्दल माननीय हरीषजी बळी साहेब यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व अभिनंदन
अरुण जाधव मंगेशजैवाळ
याचिकाकर्ते