या संवर्गातील कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी वेतनस्तर लागु करणेबाबत, शासन निर्णय निर्गमित nivadshreni shasan nirnay दि.31.01.2025
निवडश्रेणी वेतनस्तर लागु करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
सदर शासन आदेशानुसार नमुद करण्यात आले आहे कि, उप सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना एस – 27 हा निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्याचे आदेश वित्त विभागाच्या दि. 13.02.2023 व सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 28.03.2023 रोजीच्या संदर्भाधिन निर्णयानुसार आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
सदर शासन आदेशानुसार नमुद मंत्रालयीन विभागातील अधिकाऱ्यांना वेतनस्तर एस 25 रुपये 78800-209200/- आदेशांमध्ये नमुद दिनांकास वेतनस्तर एस 27 रुपये 123,100-215,900/- हा निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्यात येत आहे.
सदर अधिकाऱ्यांची यादी प्रवर्ग व कार्यरत विभाग व एस 27 निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्यात आलेला दिनांक यांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे. सदर अधिकाऱ्यांची वेतननिश्चिती ही महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नुसार करण्यात आली आहे.
सदर निवडश्रेणी ही मा. सवोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुज्ञा याचिका कक्ष अधिकारी संवर्गाच्या ज्येष्ठतेबाबत मा. उच्च न्यायालयोन पारित केलेल्या दिनांक 06.08.2018 रोजीच्या आदेशाबाबत मा. सर्वोच्च न्यायालय याचिका व त्यातील आय.ए.क्र.2590/2019 मध्ये होणाऱ्या निर्णयाच्या अधिन राहून देण्यात येत आहे .
संदर्भ: १. वित्त विभाग, शासन निर्णय क्र. वेपुर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दि.१३.०२.२०२३.
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. निपानि-२०२३/प्र.क्र.१३/कार्या.१२, दि.२८.०३.२०२३.
आदेश
मंत्रालयीन विभागातील खालील अधिकाऱ्यांना (वेतनस्तर एस-२५ रु.७८८००-२०९२००) स्तंभ क्र.५ मध्ये
दर्शविलेल्या दिनांकास वेतनस्तर एस-२७ (रू.१२३१००-२१५९००) हा निवडश्रेणी वेतनस्तर लागू करण्यात येत आहे.
२. वरील अधिकाऱ्यांची वेतननिश्चिती ही त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून, महाराष्ट्र नागरी सेवा
( वेतन) नियम, १९८१ च्या नियम ११(४) नुसार करण्यात यावी.
३. सदर अधिकाऱ्यांना एस-२७ (वेतनश्रेणी रू. १२३१००-२१५९००) हा निवडश्रेणी वेतनस्तर खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
अ) मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७, कक्ष अधिकारी संवर्गाच्या ज्येष्ठतेबाबत मा. उच्च न्यायालयाने पारीत केलेल्या दि.०६.०८.२०१८ रोजीच्या आदेशाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२५१८१/२०१८ व त्यातील आय.ए.क्र.२५९०/२०१९ मध्ये होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
आ) मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील प्रलंबित असलेल्या रिट पिटीशन क्र. ३३१०/२०२१ व रिट पिटीशन क्र.३३११/२०२१ यामधील आय.ए.क्र.१८५४/२०२१ व १८५५/२०२१ तसेच रिट पिटीशन क्र.३३१२/२०२१ मध्ये होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०१३११३४१४९९२०७ हा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,