इ.10वी 12वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरणेबाबत practical internal marks fill online
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी परीक्षा फेब्रु / मार्च २०२५ चे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत (practical & Internal) मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत.
संदर्भ राज्य मंडळाचे पत्र क्र. रा. म. परीक्षा-२/१२० दिनांक ०९/०१/२०२५
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) फेब्रु/मार्च २०२५ साठी गणकयंत्र विभागामार्फत सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना online पध्दतीने प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण व श्रेणी मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर Login मधून भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे. सदर संकेतस्थळावर गुण / श्रेणी भरणेसाठीचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.
गतवर्षीप्रमाणेच सर्व विभागीय मंडळांनी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेसाठी आउंट ऑफ टर्न ने आयोजित करावयाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच आयोजित करण्यात याव्यात. सदर आउट ऑफ टर्न परीक्षांचे गुण व श्रेणी ही उपरोक्त प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे पाठवावयाचे आहेत.
त्याअनुषंगाने सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन पध्दतीने गुण भरुन मंडळाकडे पाठविण्याच्या सर्वसाधारण सुचना पत्रासोबत जोडले आहेत.
सोबत सर्वसाधारण सूचना