अपघातात मयताच्या वारसांना बँक ऑफ महाराष्ट्रकडून ४० लाखांचा धनादेश महाबँक सॅलरी सेविंग योजना bank of maharashtra saving account
जळगाव : `बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताच्या अनेक योजना राबवत असते.ग्राहकाने महाबँक सॅलरी सेविंग योजनेत उघडले होते बँक खाते याचाच फायदा हा चोपडयातील बँकेच्या एका ग्राहकाला झाला आहे. चोपड्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत शासकीय सेवेत असलेल्या एका ग्राहकाने पशुवैद्यकीय रुग्णालयात कार्यरत असताना ‘महाबँक सॅलरी सेविंग योजना’ अंतर्गंत आपले पगार खाते बँक ऑफ महाराष्ट्र उघडले होते. बँकेच्या सर्व सुविधांचे ते लाभ घेत असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला त्यामुळे ‘महाबँक सॅलरी सेविंग योजना’ अंतर्गत ४० लाख रुपयांचा विनामूल्य अपघाती मृत्यू विमा त्यांना मंजूर झाला असून बँकेकडून त्यांच्या वारसांना विम्याची रक्कम सुपुर्द करण्यात आली. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र अंचल प्रबंधक प्रवीण कुमार सिंह, शाखा प्रबंधक अमीत कुमार, उपप्रबंधक रजत व नियोजन अधिकारी अभिनव यांच्या हस्ते देण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र यहा बँकेने गेल्या एक वर्षात जळगाव, चोपडा, पारोळा, शहादा, हिसाळे येथे सुद्धा अशाच प्रकारे क्लेम सेटल केलेले आहेत.
दरम्यान, दिवंगत ग्राहकाच्या परिवाराने विम्याच्या मिळालेल्या रकमेमुळे त्यांचे घर वाचल्याची भावना व्यक्त करत बँकेचे आभार मानले आहेत.
अपघातात अपंगत्व आल्यास ४०
लाखांचे कवच
‘महाबँक सॅलरी सेविंग योजना’ अंतर्गत अपघाती पूर्णत : अपंगत्व विमा ४० लाख रुपये, आंशिक अपंगत्व विमा २० लाख, विमान अपघात मृत्यू १ कोटी, गोल्डन अवर मेडिक्लेम १ लाख अशा विविध लाभ हे बँकेकडून विनामूल्य पगार खातेधारकांना प्रधान केले जाते. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले पगार खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कुठल्याही जवळच्या शाखेत जावून काढून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे.
ग्राहकाने महाबँक सॅलरी सेविंग योजनेत उघडले होते बँक खाते