शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती न करणे बाबत patha tachan
संदर्भ :- १. मा. सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेयांचे पत्र क्र. सेपूवी / राशीप्रम/ पाठ / टाचन/2019/3637 दिनांक 05.09.2019
2. कृष्णा तांबे जिल्हा अध्यक्ष मुष्टा शिक्षक संघटना जालना यांचे निवेदन दिनांक 23.06.2023
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास सुचित करण्यात येते की तालुक्यातील सर्व व्यवसथापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांतील मुख्याध्यापकांना / शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी: सक्ती करण्यात येऊ नये अशा संदर्भाचे पत्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांचे कडुन प्राप्त झालेले आहे. त्यानुसार यथा नियम कार्यवाही करण्यात यावे.
सदर सर्व माध्यमाच्या शाळांतील मुख्याध्यापकांना / शिक्षकांना आपल्या स्तरावुन सुचना देण्यात याव्या तसा अहवाल या कार्यालयात सादर करण्यात यावा.