इयत्ता १ ली ते १० वी करिता सुधारीत विषयवार तासिका विभागणीबाबत शासन निर्णय vishayvar tasika vibhagni gr
संदर्भ
– १) विद्या प्राधिकरणाचे दिनांक २८ एप्रिल, २०१७ चे पत्र
२) दिनांक १८ जुलै २०१७ रोजी मा. मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
३) दिनांक २३ ऑगस्ट, २०१७ रोजीचे बैठकीचे इतिवृत्त.
उपरोक्त विषयान्वये दिनांक २८ एप्रिल, २०१७ रोजी इयत्ता १ ली ते ८ वी करित्ता विषयावर तासिका विभागणीबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. सदर परिपत्रकातील तासिका विभागणीत अंशतः बदल करण्यात
येत आहे. सदर परिपत्रक सन २०१७-१८ च्या द्वितीय सत्रापासून लागू करण्यात येत आहे. १) इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका राहील.
२) एका वर्गाचा आठवडयाचा एकूण कार्यकाल पूर्वी २६.४५ मि.होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर कार्यकाल २७.१० मि. होईल त्यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल.
३ ) दिनांक २८ एप्रिल, २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरूवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशीचा परिपाठ १० मिनिटांचा राहील.
४) सुधारीत परिपत्रकानुसार शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ ५ ) शनिवारी ५ तासिकांऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात. पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक
मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिकां ३० मिनिटांची राहील.
तासिका ३० मिनिटांची राहील.
६ ) सुधारीत वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका हया कला आणि, आरोग्य व शारीरिक शिक्षण या
विषयांसाठी देण्यात याव्यात.
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
(डॉ. सुनिल मगर) संचालक विद्या प्राधिकरण, पुणे ३०
१) मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
३) मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
४) मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त कार्यालय, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) ६) आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव :-
१) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
२) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
३) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे
४) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
५) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) ६) प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (सर्व)
👉👉इयत्ता पहिली ते दहावी करिता सुधारित विषयवार तासिका विभागणी शासन निर्णय येथे पहा Click Here