दिवाळी सणानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना सुट्टी बाबत election commission letter 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिवाळी सणानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना सुट्टी बाबत election commission letter 

संदर्भ : या कार्यासनाचे समक्रमांकाचे दिनांक १८.१०.२०२४ रोजीचे कार्यालयीन आदेश,

-: कार्यालयीन आदेश

मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्यये महाराष्ट्र विधानसना सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु असते.

दिनांक १.११.२०२४ ते ३.११.२०२४ या कालावधीमध्ये दिवाळी सण असल्याने दिनांक १.११.२०२४ या दिवशी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना सुट्टी देण्यात येत आहे. तथापि, सदर दिवशी ज्या कार्यासनातील कामकाज अविरतपणे सुरु ठेवणे आवश्यक आहे, त्या कार्यासनाच्या अवर सचिव यांनी आवश्यकतेनुसार आपल्या अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयीन उपस्थितीबाबत सूचना द्याव्यात.

तसेच दिनांक ०२.११.२०२४ य ०३.११.२०२४ या दिवशी या कार्यालयाच्या समक्रमांकाच्या दिनांक १८.१०.२०२४ रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या सूचनांनुसार दिवशी कामाची निकड / आवश्यकता विचारात घेऊन कोणते अधिकारी/ कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे, याचा निर्णय संबंधीत अवर सचिव यांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा.

तथापि, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष दिनांक १.११.२०२४ ते ३.११.२०२४ या कालावधीमध्ये देखील नियमितपणे २४ X ७ सुरु राहील.

आदेशानुसार,

निवडणुक आयोगाचे परिपत्रक येथे पहा pdf download