एन.एम.एम.एस. व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत. Nmms online application start
NSP २.० पोर्टलवरील एन.एम.एम.एस. व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत.
संदर्भ :- मा. शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. शिसंयो/एन.एम.एम.एस./२०२४-२५/यो-२/०१८९६, दि.०८.०७.२०२४.
उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, NMMSS शिष्यवृत्ती प्रक्रीयेंतर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी NSP पोर्टलवर नवीन (Fresh) व नुतनीकरण (Renewal) अर्जाच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांच्या लॉगीन वरुन अर्ज सादरीकरणासाठी दिनांक ३१ सप्टेंबर, २०२४ ही अंतिम मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. तसेच शाळास्तरावरुन (L.N.O.) पडताळणीसाठी शेवटची तारीख ही १५ ऑक्टोबर, २०२४ व द्वितीय स्तर (जिल्हास्तर) पडताळणीसाठी अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर, २०२४ असल्याचे देखील कळविण्यात आलेले आहे.
यापूर्वी आपणास कार्यालयीन पत्रान्वये तसेच वेळोवेळी व्हॉट्सअॅप गृप वर देखील अर्ज विहित मुदतीत सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे असूनही अद्यापपावेतो सोबत जोडलेल्या यादीतील नवीन ४६ व नुतनीकरणाच्या ६१ विद्यार्थ्यांचे अर्ज NSP पोर्टलवर सादर केलेले नाहीत. ही बाब उचित नाही. प्रलंबित विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत भरुन घेण्याची जवाबदारी ही संबंधित मुख्याध्यापकांची असून दिनांक ३१ सप्टेंबर, २०२४ पूर्वी सर्व पात्र असलेल्या प्रलंबित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना शाळास्तर लॉगिन मधून कागदपत्रांची पडताळणी करुन पात्र / अपात्र (Verify/Reject/Defect) करण्याबाबतची कार्यवाही करावी. व विद्यार्थ्यांची कागदपत्रे आपले दप्तरी जतन करुन ठेवावीत.
NMMS मधील नवीन अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती आधारनुसार नसल्यास तसेच ज्या विद्याथ्यर्थ्यांनी शाळा बदलली आहे व चालू वर्षी इ.१० वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत आहेत. (फक्त १० वी व १२ मध्ये शाळा बदलून गेलेले विद्यार्थी) तसेच नुतनीकरण मधील ज्या विद्याथ्यांचे अर्ज डिफेक्ट झाल्यामुळे शाळेच्या नावामध्ये बदल करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांची माहिती विहित मुदतीत व विहित नमुन्यात हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये दुरुस्तीसाठी या कार्यालयास पाठविण्यात यावी. (नमुने संलग्न) कृ.मा. पहा…
॥२॥
त्याचप्रमाणे या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहेत की, यापूर्वी यादीसह सूचना पत्रे निर्गमित करुन देखील NMMS शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र झालेल्या काही शाळांनी अद्यापपावेतो NSP पोर्टलवर आपली नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज सादरीकरणाच्या वेळी शाळा Search होत नसल्याने अर्ज सादरीकरणाची प्रक्रीया पूर्ण होवू शकत नाही. तरी, सोबत जोडलेल्या नवीन (Fresh) विद्यार्थ्यांच्या यादीतील नोंदणी न केलेल्या शाळांनी NSP पोर्टल वर (सोबत दिलेल्या PPT प्रमाणे) तात्काळ नोदणीची प्रक्रीया पूर्ण करावी. सदर कारणामुळे विद्यार्थी जर शिष्यवृत्ती पासून वंचित राहीला व त्यासंबंधी कोणतीही तक्रार, न्यायालयीन प्रकरण, विधानमंडळ तारांकीत अतारांकीत प्रश्न उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात येईल. याची गांभिर्याने नोंद घ्यावी.