प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहार २०२४-२५ crop insuarance 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहार २०२४-२५ crop insuarance 

शासन निर्णय क्र. फवियो/२०२४/प्र.क्र.८१/१० जे दिनाक १२/०६/२०२४ अन्वये प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहार २०२४-२५ करीता बजाज अलायन्झ जनरल इन्सुरन्स कंपनी लि.पुणे मार्फत बीड जिल्हयात संत्रा, लिंबू, पेरु, चिकू, मोसंबी, डाळींब व सिताफळ या फळपिका करीता राबविण्यात येणार आहे.

* संत्रा, पेरु व लिंबु या फळपिकांचा विमा हप्ता उतरविण्याची अंतीम तारीख २५ जुन २०२४, मोसंबी व चिकु या फळपिका करीता ३० जुन २०२४ डाळिंब या फळपिका करीता १४ जुलै २०२४ तर सिताफळ या फळपिका करीता ३१ जुलै २०२४ अशी आहे.

• नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकन्यांना विमा संरक्षण देणे,

* फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थित शेतकयांचे आर्थिक स्वैर्य अबाधीत राखणे.

* पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकयांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.

* कर्जदार शेतकऱ्याला योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित फळपिकांकरीता नोंदणीच्या अंतीम मुदतीच्या ७ दिवस आधी पर्यंत संबंधीत बँकेस विमा हप्ता कपात न करणे बाबत कळविणे आवश्यक राहिल (सहपत्र- ५). जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

• केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

Leave a Comment