जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर येथे महर्षी वाल्मिकी ऋषी पालखी सोहळ्यात वैष्णवांची मांदियाळी zpp school kambleshwar
। अश्व रिंगण सोहळा संपन्न । नवभारत पायाभूत साक्षरता कार्यक्रम असाक्षरांचे सर्वेक्षण ।
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे संत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे विद्यार्थी शिक्षक पालक यांनी निरा नदीकाठी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सदर कार्यक्रमात बाल वारकऱ्या सोबत गावातील आबाल वृद्धांनी सहभाग नोंदवला . अभंगावर फेर घालून महिलांनी विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘या मंत्राचा जयघोष केला .शाळेतील सर्व विद्यार्थी बाल वारकरी रूपामध्ये हजर होते . विद्यार्थी, शिक्षक, माता भगिणी यांनी फुगडी चा आनंद लुटला . ग्रामस्थांच्या वतीने भावीक भक्तांना मिठाई, बिस्किट चहा -पान आदींचे वाटप करण्यात आले .
पालखी सोहळ्यामध्ये विद्यार्थी वर्गासाठी आकर्षणाचा विषय म्हणजे अश्व रिंगण सोहळा .सर्वांच्या उपस्थितीत अश्व रिंगण सोहळा पार पाडल्याने भक्तीमय वातावरणात सर्वांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.
मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ . सुनिता शिंदे यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत ग्रंथदिंडी पालखीचे आयोजन करून असाक्षर लोकांचे सर्वेक्षण केले . शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले . दिंडी सोहळ्यामध्ये सुरू असलेल्या असाक्षर लोकांच्या सर्वेक्षणाबाबत माहिती देण्यात आली .
सर्वसाधारणपणे २ तास वैष्णवांची मांदियाळी ग्रंथदिडी पालखी सोहळा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे संपन्न झाला . विद्यार्थ्या प्रत्यक्ष पालखी सोहळ्यात सहभागी झाले .