जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम, (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२४-२०२५ अखेर करावयाच्या कामकाजबाबत zpfms fund monetring system
वाचा :-१. ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक आयटी-२०१६/प्रक्र.५९/मार्तक, दिनांक १४ ऑक्टोंबर २०२०.
२. ग्राम विकास विभागाचे पत्र क्रमांक झेडपीए-२०२५/प्र.क् ४१/वित्त-४ दिनांक १० मार्च २०२५.
३. ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक आयटी-२०१६/प्रक्र.५९ (भाग२)/मातंक दिनांक २५ मार्च २०२५.
जिल्हा परिषद फंड मॉनेटरिंग प्रणालीनुसार वार्षिक लेखा सन २०२४-२०२५ चे लेखांकन पुर्ण करणे विषयक सुचना-
जिल्हा परिषद स्तर व पंचायत समिती स्तर:-
१. कोषागारातून प्राप्त होणारे रकमांचे लेखांकन पुर्णकरण्याच्या अनुषंगाने देयकांची जमा व खर्चाची ताळमेळ पुर्ण करण्याची कार्यवाही ही दिनांक ३० एप्रिल, २०२५ पर्यंत पुर्ण करण्यात यावी.
२. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाने व पंचायत समितीतील वित्त विभागाने लेखांकन पुर्ण करण्याची कार्यवाही ही दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करावी
३. वित्त विभागातील मुख्यालयीन स्तरावरील सर्व लेखांकन हे ताळमेळ, (Transfer Entry) विषयक दुरुस्ती,
नोंदीमधील तफावती, इत्यादी विषयक सर्व कार्यवाही दिनांक १० मे २०२५ पर्यंत पुर्ण करुन माहे मार्च २०२५ चे मासिक लेखे परिपुर्ण तयार करावेत.
४. ग्राम विकास विभागाचे पत्र क्रमांक झेडपीए-२०२५/प्र.क् ४१/वित्त-४, दिनांक १० मार्च २०२५ अन्वये वित्तीय वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये, जिल्हा परिषदांनी आभासी वैयक्तिक ठेव प्रणाली मधुन, जी प्रदाने केली आहेत त्यांच्या नोंदी हया ZPFMS प्रणालीत घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यानुसार, सर्व नोंदी डाटा ऐंट्री पुर्णकरुन, मासिक / वार्षिक लेखा पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.
५. पंचायत समिती सर्व लेखांकन / मासिक / वार्षिक लेखा हा ताळमेळ, सर्व नोंदीसह जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम (ZPFMS) बस्तील सर्व लेखांकन हे दिनांक २० मे २०२५ पर्यंत पुर्ण करण्यात यावे.
६. पंचायत समिती व मुख्यालयासह सर्व एकत्रित लेखांकन/मासिक/वार्षिक लेखा हा ताळमेळ, सर्व नोंदीसह जिल्हा परिषद फंड मॉनेटरिंग सिस्टीम (ZPFMS) वरळील सर्व लेखांकन हे दिनांक २५ मे २०२५ पर्यंत पुर्ण करण्यात यावे.
७. जिल्हा परिषद फंड मॉनेटरिंग सिस्टीम (ZPFMS) नुसार वार्षिक लेख्यातील तफावती असल्यास सदरची दुरुस्ती Help Desk, ZPFMS व राज्य समन्वयक (ZPFMS) यांच्या माध्यमातुन निराकरण करुन वार्षिक लेखेदिनांक १० जून २०२५ पर्यंत पुर्ण करावेत.
८. शासन तरतुदीनुसार वार्षिक लेखा सर्व प्रक्रिया ही दिनांक ३० जून २०२५ पर्यंत पुर्ण करण्यात यावी, आणि ग्रामविकास विभागाचे महसुली लेख्यांचे विवरण १ ते ४ हे देखील दिनांक ३० जून २०२५ पर्यंत तयार ठेवावीत,
९. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम १३६ (१) नुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लेखासंहिता १९६८ च्या नियम ६५, ६६ अ नुसार दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी.
१०. जिल्हा परिषदस्तरावर व पंचायत समिती स्तरावर सर्व लेखांकन है ZPFMS प्रणाली मध्ये Online पध्दतीने करणे बंधनकारक आहे. (रोजकिर्द पंधरावा वित्त, पंचायतराज सेवार्थ देयक इत्यादी वगळुन तथापि काही तांत्रिक कारणास्तव देयके Online करण्यास अडचणी निर्माण झाल्यास सदर अडचणी हे राज्य
समन्वयक यांनी खात्री करुन त्तदनंतर सदरच्या नोंदी पुर्ण होणे बाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, वरील नमुद सुचनांनुसार, प्रचलीत नियम / वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय / परिपत्रक / शासन आदेश यांचे
पालन करण्यात येऊन विहित कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सन २०२४-२०२५ चे लेखांकन पुर्ण करण्यात यावे.