जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर येथे माजी विद्यार्थी श्री दिलीप माधवराव जगताप यांची शाळेला भेट zp school kambleshwar 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर येथे माजी विद्यार्थी श्री दिलीप माधवराव जगताप यांची शाळेला भेट zp school kambleshwar 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शाळेचे माजी विद्यार्थी श्री . दिलीप माधवराव जगताप माजी पोलीस उपायुक्त ( डीसीपी मुंबई ) यांची शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीत शाळेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले .विद्यार्थ्यांना शालेय जिवनात अभ्यासास महत्व देणेबाबत तसेच आपणास जे समजत नसेल , अडचण येईल तिथे न घाबरता शिक्षक वर्गांची मदत घ्या . इंग्रजी /खाजगी माध्यमाच्या अनेक शाळा आल्या पूर्वीही शहरात ती च परिस्थिती होती परंतू जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी कुठही कमी पडत नसून पुन्हा जिल्हा परिषद शाळेचे पट वाढताना दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले . त्यांनी सन २०२२ – २३ मध्ये शाळेतील १०५ विद्यार्थ्यांना त्यांचे मार्फत मोफत बुट सॉक्स वितरण ( २२००० रु ) करण्यात आले होते . त्याचबरोबर चालू वर्षे २०२४ -२५ शाळा शुभारंभ माननीय शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे व मा . गटाशिक्षणाधिकारी पंचायत समिती बारामती यांच्या आव्हानास प्रतिसाद देत 11 हजार 350 रुपयांच्या वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले होते . शासन स्तरावरून मोफत पुस्तक योजना राबवली जाते पालकांना वह्या विकत घ्याव्या लागतात ही बाब लक्षात घेऊन आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आपण ज्या शाळेमुळे घडलो त्याचे स्मरण माजी विद्यार्थी योगदान म्हणून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी वह्या वाटप करणेसाठी उपलब्ध करून दिल्या .
आपल्या मनोगतामध्ये त्यांनी शाळेच्या पटवाढीबद्दल व शिक्षक स्टाफ प्रामाणिकपणे तळमळीने झटत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले . तसेच शाळेच्या भौतिक सुविधांची माहिती घेतली त्याचबरोबर आवश्यक लागणाऱ्या सुविधा बद्दल मदत करण्याची भूमिका त्यांनी मांडली . लहान वयात आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा अभिमान वाटत असल्याचे बालवर्गाला सांगितले . त्यांच्यासमवेत श्री दत्तू पाटील सरपंच उळे – कोल्हापूर हे उपस्थित होते .त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे सौ मनीषा चव्हाण सर्व शिक्षक स्टाफ शाळेच्या वतीने माजी विद्यार्थी योगदानाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला . सर्वसामान्यांच्या मुलांसाठी शाळेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात असून पुढील काळातही विद्यार्थी विकासास चालणा दिले जाईल असे मत उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे यांनी व्यक्त केले . उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे यांनी आभार मानले .

Leave a Comment