डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे बाल सभेचे आयोजन zp primary school kambleshwar
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले होते .जयंतीनिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .या बालसेभेचे अध्यक्ष पद कु .कशिष पवार इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनीस देण्यात आले होते .सदर कार्यक्रम मुख्याध्यापक श्री . ज्ञानदेव सस्ते उपशिक्षिका सौ .सुनिता शिंदे सौ . मनीषा चव्हाण व अंगणवाडी ताई गायकवाड मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर भाषणे केली .इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी भाषणे केली . कशिष पवार, वेदांत जगताप ,तृप्ती जगताप ,शिवम खलाटे ,विवेक खरात,आयुष इंगळे, पियुष इंगळे, राजवीर जगताप शिवण्या काकडे, श्रीतेज चव्हाण ,कुमारी घोरपडे या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल माहिती सांगितली .विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले व इयत्ता चौथी मधील विवेक खरात याने बाल सभेत उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .
