कमी पटसंख्येच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्ती रद्द zp jalgaon decision
प्रतिनिधी | जळगाव
शालेय शिक्षण विभागातर्फे १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये १५ हजार रुपये मानधनावर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती प्रक्रीया तूर्त थांबवण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या राज्यभरातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळांत कंत्राटी पद भरतीसाठी अर्ज प्रक्रीया सुरु करु नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अदा करणे बाबत
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनेच
शैक्षणिक वर्ष 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर
राज्य शासनाने ५ सप्टेंबरला २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत सेवानिवृत्त, कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेतला होता. पण, त्यास राज्यभरातील शिक्षकांनी कडाडून विरोध करीत आक्रोश मोर्चा काढला होता. अनेक शिक्षक संघटनानी या निर्णयाबाबत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने २० पटसंख्या, निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या वर्गावर नियमीत ऐवजी स्थानिक डीएड किंवा बी.एड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारास संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या उमेदवारास १५ हजार रुपये मानधनासह, काही नियमावली निश्चित केली होती. त्यासाठी पुढील आठवड्यापासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार होती; पण, ५ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीत ती प्रक्रिया तूर्त स्थगित केली असून पुढील आदेशानंतर कळवण्यात येईल, अशा सूचना देखील दिल्या म आहे. त्यामुळे डीएड व बीएड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.