जिल्हा परिषद फंड मॉनेटरिंग सिस्टीम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्षे २०२३-२४ च्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत zp fund monitoring system
संदर्भ :- शासनाचे समक्रमांकाचे दिनांक ०२.०४.२०२४ व दिनांक २३.०४.२०२४ रोजीचे पत्र.
महोदय,
उपरोक्त विषयावरील या विभागाच्या दिनांक २३.०४.२०२४ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम (ZPFMS) या प्रणालीमध्ये वित्तीय वर्ष सन २०२३-२४ मधील लेखांकन पूर्ण करण्यास दिनांक ३० एप्रिल, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सदरहू मुदतीत जिल्हा परिषदांनी लेखांकन पूर्ण करणे अपेक्षित होते. तथापि लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कामकाजासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने विहित मुदतीत लेखांकनाचे कामकाज पूर्ण करण्यात आलेले नसल्याने ब-याच जिल्हा परिषदांनी कामकाज पूर्ण करण्यासाठी काही कालावधीसाठी जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम (ZPFMS) या प्रणालीमधील टैब चालू करण्याची विनंती केली आहे.
२. सबब, या विभागाच्या संदर्भाधीन दिनांक २३.४.२०२४ रोजीच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे सन २०२३- २४ या वित्तीय वर्षातील लेखांकन पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम (ZPFMS) या प्रणालीमधील सुविधा दिनांक १४.६.२०२४ ते १८.६.२०२४ या कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
३. जिल्हा परिषदांनी लेखांकन पूर्ण करण्यास दिलेल्या वरील वाढीव कालावधीमध्ये लेखांकन पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी. आवश्यकता असल्यास सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना सुट्टीच्या दिवशीही उपस्थित रहाण्याच्या सूचना देवून मुदतीत कामकाज पूर्ण करण्यात येईल. या कालावधीमध्ये
33
D-ZPMS Note letter stZPFMS Note & Letter doск
Scanned with OKEN Scanner
लेखांकनाचे कामकाज पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांची राहील, लेखांकनाचे कामकाज पूर्ण न झाल्यास निधी खर्च न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी यांची राही यांची कृपया नोंद घ्यावी.
