फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार झेडपी, पालिकांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची चाहूल zp election
विधानसभेनंतर नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची चाहूल, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता
Beed news दि. २५ (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्रातील विधानसभेचा रणसंग्राम संपलाय, या निवडणूकीत महायुतीने प्रचंड बहुमत विधानसभेत मिळवल्यानं मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकही आता लवकरच होण्याची शक्यता आहे. नव्या वर्षातील फेब्रुवारी-मार्चमध्ये जिल्हा परिषदा आणि नगर पालिकांसाठी सत्ता संघर्ष सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचअनुषंगाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटण्याची
शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या दोन-अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती
निवडणुकीस किमान पाच महिने लागतील – संचेती
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीवर अद्याप सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही,
मी स्वतः याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सरकारच्या बाजूने वातावरण तयार
झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र न्यायालयातील
प्रक्रिया पुर्ण होण्यास जवळपास तीन महिण्यांचा कालावधी लागू शकतो, त्यानंतर निवडणूकीची पुढची
प्रक्रिया पूर्ण पुर्ण होण्यास किमान दिड ते दोन महिणे लागतील, त्यामुळे या निवडणूक पाच महिण्यांनतरच
होतील, असे मत याचिकाकर्ते उल्हास संचेती यांनी दै. लोकाशाशी बोलताना व्यक्त केले आहे.
स्थानिकच्या निवडणुकीवरून पुन्हा जिल्ह्यातील वातावरण तापणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत म्हणून अनेकांनी विधानसभेत आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. आता नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होतील असा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणूकीवरून पुन्हा जिल्ह्यातील
वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे.
युती अन् आघाडीतील राजकारणामुळेच स्थानिकच्या निवडणूका लांबल्या
मागच्या पाच वर्षात राज्यात जे नाही ते राजकारण पहायला मिळाले, याच राजकारणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, हा वाद न्यायालयात गेला, त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लांबणीवर गेल्या, मागच्या दोन अडीच वर्षांपासून या निवडणूका झालेल्या नाहीत, त्यामुळे सध्या
प्रशासकाच्या हाताने या संस्थांचा कारभार सुरू आहे. परिणामी आता महायुती आणि आघाडी या
निवडणूका घेण्यास खऱ्या अर्थाने अनुकूल झाल्याचे पहायला मिळत आहे.