YCMOU सन 2024-26 बी.एड प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती पुस्तिका (दोन वर्षाचा बी.एड अभ्यासक्रम) ycmou bed addmission process booklets 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

YCMOU सन 2024-26 बी.एड प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती पुस्तिका (दोन वर्षाचा बी.एड अभ्यासक्रम) ycmou bed addmission process booklets 

१. शिक्षणक्रमासंबंधी माहिती

देशभरातील पारंपरिक विद्यापीठांमधून दोन वर्षे कालावधीचा नियमित बी.एड. शिक्षणक्रम सुरू आहे. नियमित बी.एड. शिक्षणक्रम सेवांतर्गत शिक्षकांना करता येणे शक्य नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठाने सेवांतर्गत शिक्षकांसाठी नोकरी करताना पूर्ण करता येईल असा २ वर्षे कालावधीचा ‘सेवांतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम’ (बी.एड.) १९९१ पासून सुरू केला.

(२.१) कालावधी या शिक्षणक्रमाचा किमान कालावधी २ वर्षाचा व कमाल कालावधी ५ वर्षाचा आहे. कमाल पाच वर्षाच्या कालावधीत शिक्षणक्रम पूर्ण न केल्यास अध्ययनार्थीस कमाल कालावधी संपल्याच्या दिवसापासून, पुन्हा पाच वर्षासाठी त्या वर्षाच्या तुकडीचे संपूर्ण शुल्क भरून पुननोंदणी करता येईल.

(२.२) एकूण श्रेयांक हा शिक्षणक्रम ८० श्रेयांकांचा म्हणजे सुमारे २४०० अध्ययन तासांचा आहे. (एक श्रेयांक म्हणजे ३० ते ३५ तासांचा अभ्यास होय.)

(२.३) शिक्षणक्रम माध्यम बी.एड. शिक्षणक्रमाचे माध्यम मराठी आहे. या शिक्षणक्रमाचे स्वयं अध्ययन साहित्य मराठीत आहे.

भाग- 1- बी.एड. प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना

महत्त्वपूर्ण सूचना

१) अर्जदाराने या शिक्षणक्रमाची प्रवेश माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या वेबसाईटवरून घ्यावी. माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे या शिक्षणक्रमासाठी असलेल्या प्रवेश लिंक वरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना आपण भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री अर्जदाराने करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात नंतर कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही. याची नोंद घ्यावी. प्रवेश अर्जात

भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करूनच ‘Submit’ बटण दाबावे.

२) प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर तीन दिवस स्वतःच्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची संधी (स्वयं संपादन) अर्जदाराला देण्यात येईल. या मुदतीतच अर्जदाराने प्रवेश अर्जात आवश्यक ती दुरुस्ती

करावी. ) २०२४-२६ बी.एड. तुकडीचा प्रवेश अर्ज भरण्यासाठी सेवा अनुभव दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत नोंदविता

३ येईल. या तारखेनंतरचा सेवा अनुभव यावर्षीच्या प्रवेशासाठी विचारात घेतला जाणार नाहीत.

४) ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या संपूर्ण माहितीचे मूळ पुरावे पडताळणीवेळी आपणाकडे असणे अनिवार्य

असेल. मूळ कागदपत्र सादर न केल्यास संबंधित माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.

५) बी एड. प्रवेश अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- आहे. प्रवेश

अर्ज भरतेवेळी सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.

६) ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जातील माहिती आधारे खुला व आरक्षित वर्गाची केंद्रनिहाय कागदपत्र पडताळणी यादो प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार गुणवत्ता यादीतील केंद्रनिहाय प्रवेश संख्येनुसार संबंधित अर्जदाराने विभागीय केंद्रावर आपल्या प्रवेश अर्जाची पडताळणी करून घ्यावी. विभागीय केंद्राने अर्जदाराच्या प्रवेश अर्जातील भरलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर केंद्रनिहाय प्रवेश गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर विद्यापीठ व अभ्यासकेंद्र शुल्क भरून अर्जदाराने आपला प्रवेश नियोजित कालावधीत निश्चित करावा. आपल्या प्रवेशासंदर्भातील माहिती / कागदपत्रे चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाल्यास विद्यापीठ समिती मार्फत आपल्या प्रवेशाची चौकशी करण्यात येईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास आपला प्रवेश रद्द करण्यात येईल, प्रवेश रद्द करताना

आपण भरलेले प्रवेश शुल्क परत केले जाणार नाही. तसेच आपल्यावर खोटी माहिती पुरविल्यासंदर्भात FIR

दाखल केला जाईल. याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. ज्या अर्जदारांना आरक्षणाअंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे.

अशा अर्जदारांनी शासन निर्णयानुसार आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे तसेच नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र

विभागीय केंद्र प्रवेश अर्ज पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.

७) विभागीय केंद्रावर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर प्रवेशअर्ज आपोआप लॉक होईल. त्यामुळे पडताळणी नंतर कोणत्याही बदलासंदर्भातील पत्रव्यवहार विद्यापीठाला करू नये.

बी.एड अभ्यासक्रम दोन वर्षासाठी Click here

८) अर्जदारांनी आपल्या शाळेच्या जिल्ह्यातूनच प्रवेश अर्ज भरावा अन्यथा प्रवेशप्रक्रियेतून तो बाद होईल. जिल्हानिहाय अभ्यासकेंद्राची यादी असणारा तक्ता या माहितीपुस्तिकेत बी. एड. शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्र या मुद्याअतर्गत देण्यात आलेली आहे. उदा:

मुंबई उपनगर (सबअर्बन) साठी चेंबूर सर्वकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चेंबूर हे केंद्र असेल. यात बोरिवली (URC-1), कांदिवली (URC-2), गोरेगाव (URC-3), अंधेरी (URC-4), सांताक्रूझ (URC-5), भांडूप (URC-6), घाटकोपर (URC-7), चेंबूर (URC-8), कुर्ला (URC-9), घाटकोपर (DYD_URC3), अंधेरी (DYD_URC5), मालाड W (DYD_URC6), कांदिवली E (DYD URC7), हे भाग असतील.

मुंबई शहरासाठी एस.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालय धोबीतलाव हे अभ्यासकेंद्र असेल. याप्त परेल (URC- 10), दादर (URC-11), भायखळा (URC-12), अँटरोड (DYD_URCI), सायन (DYD_URC2), मुलूड (DYD URC4) हे भाग असतील,

ठाणे जिल्ह्यासाठी – सेवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन, उल्हासनगर असेल. पालघर जिल्ह्यासाठी – ए. जी. एस. कॉलेज ऑफ एज्युकेशन बोईसर, जि. पालघर असेल.

रायगड जिल्ह्यासाठी – रायगड जिल्ह्यातील शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय असेल.

९) प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र अभ्यासकेंद्र आहे. प्रवेशार्थीने आपल्या शाळेच्या जिल्ह्याचाच अभ्यासकेंद्र म्हणून विचार करणे अनिवार्य आहे.

१०) एखाद्या जिल्ह्याच्या जागा प्रवेश अर्जाअभावी रिक्त राहिल्यास त्या विद्यापीठाच्या विभागातील उर्वरित जिल्ह्यांच्या संबंधित प्रवर्गातील सर्व अर्जदारांचा एकत्रित गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्तेनुसार संबंधित प्रवर्गातील उर्वरित जागा नव्याने तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील अर्जदारांच्या जिल्ह्यातच अतिरिक्त जागा म्हणून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. हे करताना त्या जिल्ह्यातील जागा ५० पेक्षा जास्त होणार नाही. याची खात्री करण्यात येईल.

११) दिव्यांगासाठी ५% म्हणजे एकूण ७५ जागा भरण्यात येतील. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दोन तीन जागा दिव्यांग विद्यार्थी प्रवेश कार्यपद्धतीनु‌सार गुणवत्ता यादीचा विचार करून भरण्यात येतील, ज्या जिल्ह्यात

दिव्यांगांचे अर्ज जास्त असतील त्यातील पाच जिल्ह्यांना दिव्यागांच्या तीन जागा देण्यात येतील.

१२) प्रवेशासंदर्भातील सर्व सूचना ‘http://ycmou.digitaluniversity.ac‘ या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येतील. अर्जदाराने त्या पाहून त्यानुसार कृती करणे अर्जदारांनी जबाबदारी असेल.

१३) प्रवेशांनंतर विद्यापीठाकडून बी.एड. शिक्षणक्रम संरचना, अभ्यासविषयक साहित्य किंवा अभ्यासकेंद्रात कोणत्याही कारणास्तव बदल करण्यात आला तर तो अर्जदाराला बंधनकारक असेल,

महत्त्वाचे या शिक्षणक्रमाला दिला जाणारा प्रवेश केवळ गुणवत्तेनुसार व नियमानुसार दिला जातो. अन्य कोणताही मार्ग कोणी सूचित केल्यास मा. कुलसचिव यांच्याकडे लेखी तक्रार करावी.

भाग – 11( बी.एड. प्रवेशासंदर्भात माहिती)

१. मुक्त विद्यापीठाविषयी थोडेसे –

महाराष्ट्र शासनाने मुक्त विद्यापीठाची स्थापना ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कायदा १९८९’ अन्वये १ जुलै १९८९ रोजी केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून, विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे आहे. शिक्षणाची आवड असलेल्या अनेक व्यक्तींना स्वतःची नोकरी, व्यवसाय वा उद्योग सांभाळून स्वयं-अध्ययनाद्वारे पुढे शिक्षण घेता यावे, या हेतूने मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. मुक्त विद्यापीठाचे ध्येय लोक विद्यापीठ बनणे हे आहे. मुक्त विद्यापीठाच्या कार्याची दखल घेऊन २००२ व २०१९ या वर्षी Commonwealth of Learning, Canada या संस्थेचा ‘Award of Excellence for Institutional Achievement’ हा पुरस्कार विद्यापीठाला मिळाला. दोन वेळा असा पुरस्कार मिळणारे हे जगातील एकमेव विद्यापीठ आहे. तसेच नॅक कडून विद्यापीठाला ‘ए’ श्रेणी प्राप्त झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची शिक्षणपद्धती दूरशिक्षणाची (Distance Education) आहे. विद्यापीठाने राज्यभर विखुरलेल्या अभ्यासकेंद्रांमार्फत विद्यार्थाना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

२. विद्याशाखा परिचय

विद्यापीठात एकूण आठ विद्याशाखा आहेत. शिक्षणशास्त्र विद्याशाखा त्यातील एक आहे. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे १९९० मध्ये या विद्याशाखेने नावारूपाला येण्याच्या दृष्टीने पावले उचलली. १९९१ मध्ये सेवांतर्गत शिक्षकांसाठी बी.एड., १९९४ मध्ये आशययुक्त अध्यापन पद्धती तर १९९९ पासून बालसंगोपन आणि रंजन प्रमाणपत्र शिक्षणक्रम, स्वयं-सहाय्यता प्रेरक-प्रेरिका प्रमाणपत्र शिक्षणक्रम, मूल्यशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, शिक्षकांसाठी माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान, घरकामगार कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम, शालेय व्यवस्थापन पदविका, बी.एड. (विशेष) एम.ए. शिक्षणशास्त्र आणि पीएच.डी. शिक्षणशास्त्र हे शिक्षणक्रम सुरू केले. ज्याआधारे विद्यापीठाला तळागाळातील लोकांपर्यंत बहुसंख्येने पोहोचणे शक्य झाले. त्या दृष्टीने विद्याशाखेने स्वतःची उद्दिष्टे, व्रतविधानही तयार केले आहे. या विद्याशाखेतील सर्वांत महत्त्वाचा मानला जाणारा हा सेवांतर्गत शिक्षक-प्रशिक्षण (बी.एड.) शिक्षणक्रम आहे. या विद्याशाखेच्या बी.एड. आणि एम.एड. शिक्षणक्रमाची विद्यार्थिनी श्रीमती स्वाती वानखेडे यांना Commonwealth of Learning. Canada या संस्थेने ‘Award of Excellence for Distance Learning Experience’ हा पुरस्कार २००४ साली दिला आहे.

३. हा शिक्षणक्रम कोणासाठी

ज्यांनी डी.एड. डी.टी.एड. पूर्ण केलेले आहे. असे प्राथमिक सेवांतर्गत शिक्षक या शिक्षणक्रमास पात्र असतील. ४. एन.सी.टी.ई. प्रवेश नियम

N.C.T.E. ने प्रसिद्ध केलेल्या भारताच्या राजपत्रातील परिशिष्ट क्र. १० मुद्दा क्र. ४.२ मध्ये पुढील नियमांनुसार बो.एड. प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित केली जाते.

“Eligibility”

The following categories are eligible to be students of B.Ed. Open Distance Learning

(ODL):

Trained in-services teachers in elementary Education/

ii. Candidates who have completed a NCTE recognized teacher’s education programme

through face-to-face mode/

The reservation and relaxation in marks for SC/ST/OBC/PWD and other categories shall

be as per the rules of the Central Government, whichever is applicable.”

५.जिल्हानिहाय जागा

५. एन.सी.टी.ई.ने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील बी.एड. शिक्षणक्रमाला एकूण १५०० जागांना मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ४१/४२ जागा भरण्यात येतात.

६. अतिरिक्त जागा

(६.१) गोवा, बेळगाव व बिदरः गोवा, बेळगाव, बिदर या महाराष्ट्राच्या सीमारेषे नजीकच्या मराठी भाषिक शिक्षकांसाठी प्रत्येक ५०० विद्यार्थ्यांमागे एक जागा देण्यात येईल. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांचा एक संच तयार ठेवावा. प्रवेश मुलाखतीच्या वेळी त्याचा पडताळा घेण्यात येईल. नियुक्ती आदेश व अनुभवाचे दाखले हे मराठी / हिंदी / इंग्रजीतच असावेत. इंग्रजी वा मराठीत नियुक्ती आदेश व दाखले नसतील तर त्याची मराठीत अधिकृत भाषांतर प्रत आणावी. त्यावर मुख्याध्यापकाचो सही व शिक्का असणे अनिवार्य आहे.

(६.२) प्रयोगशील शाळाः युनिसेफनी निवड केलेल्या प्रयोगशील शाळांतील अप्रशिक्षित शिक्षकांसाठी ५०० विद्यार्थ्यांमागे एक जागा राखीव ठेवण्यात येईल, या शिक्षकांनी आपले प्रवेश-अर्ज व संगणकीय अर्जाची प्रत भरून बंद पाकिटात त्यावर ‘प्रयोगशील शाळेसाठीचा अर्ज’ असे नोंदवून तो आपल्या शाळेमार्फत विद्यापीठाच्या नोंदणी कक्ष. य.च.म. मुक्त विद्यापीठ, नाशिक-४२२२२२ यांच्याकडेच पाठवावयाचा आहे, याची नोंद घ्यावी. प्रवेशासाठी त्यांना मुख्याध्यापक / संस्थाप्रमुखांचे स्वतंत्र हमीपत्र भरून सादर करावे लागेल. उमेदवारांकडून शाळेमार्फत स्वतंत्रपणे अर्ज न आल्यास त्या अर्जाचा विचार होणार नाही.

७. आरक्षण

शासन नियमानुसार व विद्यापीठ ठरावानुसार खालीलप्रमाणे अतिरिक्त व राखीव जागा राहतोल.

७.१ महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी ५०% जागा राखून ठेवलेल्या आहेत. या जागा शासनाच्या निर्णयानुसार भरण्यात येतील.

१. एन.सी.टी.ई. च्या मान्यतेनुसार एकूण जागा = १५००

२. एकूण अभ्यासकेंद्र = ३६

३. प्रत्येक अभ्यासकेंद्रावर प्रवेश संख्या ४१/४२

(७.२) विशेष मागास प्रवर्गाबाबत (SBC) गुणवत्ता यादीनुसार प्रवेशप्रक्रिया केल्यानंतर जर कोणत्याही मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागांपैकी काही जागा रिक्त राहिल्या तर त्या जागेवर एकूण प्रवेश क्षमतेच्या जास्तीत जास्त २ टक्क्यांपर्यंत विशेष मागास प्रवर्गीय उमेदवारांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.

आरक्षणच्या जागांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या बी.एड. प्रवेश मुलाखतीच्या वेळी शासन नियमानुसार जातीचे मूळ प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र तसेच ना सायस्तर प्रमाणपत्र (Non Creamy layer) (दि.०१/०४/२०२४ नंतरचे) अनिवार्य असेल. सदरचे प्रमाणपत्रे प्रवेश अर्ज पडताळणीच्या वेळी वैध असावे. तसेच शासन निर्णय क्र. एसटीसी-१००१/बी.एड. प्रवेश (२४/२००१) माशि ३ दि. ३० जानेवारी २००१ मधील तरतूद क्र. ३.५ अन्वये विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना संबंधित सक्षम अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र योग्य त्या पद्धतीचा अवलंब करून देण्याबाबतचा उल्लेखानुसार कार्यवाही

होईल.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. टीईएम ३३९७/१२९२६/(९०८६)/तांशि १ दि. ११ जुलै १९९७ शासन निर्णयातील पान क्र. २ मुद्दा क्र. १. “विशेष मागास प्रवर्गात ज्या जाती आहेत त्यापैकी काही जाती इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट होत्या, त्यामुळे सुरुवातीस विशेष मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र धारक उमेदवाराची जात ज्या मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट होती, त्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी समजण्यात यावी.”

Government of Maharashtra STATE COMMON ENTRANCE TEST CELL, Information Brochure for Centralized Admission Process (CAP), Academic Year 2024-25 माहितीपुस्तिकेमधील पान क्र. ११, मुद्दा क्र. ‘d’ Provision for Special Backward Class: Some of the casted under SBC category were earlier included in Other Backward Categoried. There fore, Such SBC candidate shall be held eligible for reservation in the backward class in which they were included previously.

नुसार अर्जदार मुळ ज्या राखीव प्रवर्गातील होता आणि त्या प्रवर्गाला लागू असणारे सर्व कागदपत्रे अर्जदाराकडे असल्यास, त्याने मूळ प्रवर्गातच अर्ज भरावयाचा आहे. मुलाखतीच्या वेळी त्याच्या मूळ प्रवर्गास लागू असणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.

अर्जदाराकडे मूळ प्रवर्गासाठी लागू असणारे कागदपत्रे नसतील, तर त्याने SBC मधून अर्ज करावा. SBC प्रवर्गाच्या संदर्भातील कागदपत्रे त्यांच्याकडे असावेत. (७.३) शासन निर्णयानुसार एकूण प्रवेश क्षमतेच्या ३० % जागा महिला अर्जादारांकरिता राखीव

राहतील.

टीप: आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल,

(७.४) दिव्यांग व्यक्तींच्या प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-२०१६/प्र.क्र.३०२/ विशि-३. प्रसिद्ध दिनांक २७ ऑगस्ट २०१८ नुसार दिव्यांग व्यक्तीच्या शिक्षणासाठी शासनाने ५ % आरक्षण ठेवलेले आहे. ते पुढीलप्रमाणे असेल. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जदारांची जनरल गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादीत येणा-या दिव्यांगांना वगळून, दिव्यांगाच्या गुणवत्ता यादीत १% शारीरिक दिव्यांगत्व, १% बौद्धिक अक्षमता, १% मानसिक वर्तणूक, १%

दिव्यांगत्व येण्याचे कारण, १% बहु दिव्यांगत्व या दिव्यांगांचा समावेश असेल. जिल्हानिहाय गुणवत्ता यादी असल्याने प्रत्येक जिल्ह्यास किमान दोन आणि कमाल तीन जागा दिल्या जातील. अशा एकूण ७५ जागा संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी शासन नियमानुसार राखीव असतील. दिव्यांग जी. आर. परिशिष्ट (दिव्यांगांबाबतची सविस्तर योजना माहितीपुस्तिकेतोल परिशिष्टामध्ये दिलेली आहे, ती पाहावी. दिव्यांगांचे आरक्षण अंतर्गत असल्यामुळे प्रथम गुणवत्तेनुसार या जागा भरल्या जातील व भरलेल्या जागा ज्या संवर्गाच्या असतील तेवढ्या जागा नियमित प्रवेशाच्या जागांमधून कमी होतील.

(७.५) सैनिक : सैन्यदलातील आजी व माजी कर्मचारी/ पत्नी किंवा त्यांचा मुलगा / अविवाहित मुलगी यांना २ % जागा राखून ठेवल्या जातील.

(७.६) स्वातंत्र्यसैनिक पती / पत्नी, मुलगा / अविवाहित मुलगी तसेच भूकंप व प्रकल्पग्रस्त आणि विधवा व परितक्ता या संवर्गासाठी अतिरिक्त २ गुण देण्यात येतील.

(या व्यतिरिक्त प्रत्यक्ष प्रवेश प्रथम फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र शासनाचे GR सर्व प्रवेशेच्छुक अर्जदारांना त्या वर्षीच्या प्रवेशासाठीही बंधनकारक असतील.)

८. शिक्षणक्रम प्रवेश पात्रता

किमान पात्रता

(८.१) यू.जी.सी. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी.

(८.२) पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना किमान ५०% (४९.५ ते ५० टक्क्यांपर्यंतचे गुण) व मागासवर्गीय अर्जदारांना किमान ४५% (४४.५ ते ४५ टक्क्यांपर्यंतचे गुण) गुण असणे अनिवार्य आहे. (महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर श्रेणी Scale लागू केली आहे अशा अर्जदारांना पदवी / पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाही, मात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.)

(८.३) डी.एड./डी.टी.एड. / हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्णवेळ / अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान दोन वर्षांचा (अर्धवेळ असल्यास ४ वर्ष) अनुभव असलेल्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल.

(८.४) प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव अनिवार्य असेल. पूर्णवेळ / अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल, असे शाळाप्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

९. प्रवेश अपात्रता

पुढील प्रकारचे अर्ज अपात्र ठरतात. तशी आवेदनपत्रे प्राप्त झाल्यास ती रद्द करण्यात येतील व अर्जदारास याबाबत कळविले जाणार नाही.

९.१) ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाहो.

९.२) सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरणारे

९.३) अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज

९.४) सध्या सेवेत नसलेले शिक्षक

९.५) तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक,

९.६) यु.जी.सी. मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक.

९.७) पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेस बसलेले, परंतु निकाल न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक.

९.८) बालवाडीत शिकविणारे शिक्षक

९.९) प्रवेश-अर्जावर मुख्याध्यापकाची सही नसणारे तसेच सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न जोडणारे अर्जदार प्रवेशास अपात्र ठरतील. मात्र मुख्याध्यापकच स्वतः उमेदवार असेल, तर संस्थेचे सचिव वा शिक्षणाधिकारी यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.

९.१०) मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेले विद्यार्थी अपात्र ठरतील.

९.११) राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्र / ना सायस्तर नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्रपडताळणीच्या वेळी मुदतीत सादर करू न शकणारे उमेदवार राखीव प्रवर्गातून

प्रवेशास अपात्र ठरतील,

१०) प्रवेश-अर्ज कसा भरावा?

अर्जदाराने बी.एड. प्रवेश-अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. त्यामुळे माहिती पुस्तिका बारकाईने वाचून मगच ऑनलाईन प्रवेश-अर्ज भरावा. प्रवेश-अर्ज भरतेवेळी अर्जदार राखीव प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र, ना सायस्तर (Non Creamy layer), जात पडताळणी दाखला इ. आरक्षणा संदर्भातील सर्व कागदपत्रे अर्जदाराजवळ असणे आवश्यक आहे. नेट बँकिंगद्वारे प्रोसेसिंग शुल्क भरल्यानंतर अर्जदाराला प्रवेश- अर्ज यशस्वीपणे भरला गेल्याचा संदेश येईल. ज्या अर्जदाराला अर्ज यशस्वीपणे भरल्याचा संदेश येईल तेवढेच अर्ज प्रवेशासाठीच्या प्रक्रियेत विचाराधीन असतील, याची नोंद घ्यावी. प्रवेश पात्रतेच्या माहितीत अर्जदाराने काही चूक केल्यास सदर अर्जदार अर्जदारांच्या यादीत नसेल. तसेच प्रवेश-अर्ज भरतेवेळी गुणवत्ता यादीवर परिणाम करणा-या घटकांबाबत अर्जदाराने केलेली चूक, अपूर्ण माहिती व पुरविलेली खोटी माहिती अर्जदारास प्रवेश प्रक्रियेतून बाद करू शकते. तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतल्याची तक्रार विद्यापीठाला कधीही प्राप्त झाली व त्या तक्रारीत तथ्य आढळल्यास सदर अर्जदाराचा प्रवेश रह होऊन शुल्कही परत केले जाणार नाही. तसेच संबंधित अर्जदारावर शासन नियमानुसार FIR दाखल केला जाईल याचीही नोंद घ्यावी. प्रवेश-अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी व भरलेला अर्ज बरोबर आहे का? ते तपासण्याची जबाबदारी पूर्णतः अर्जदाराची आहे.

(१०.१) बी.एड. प्रवेशासाठी आपणाला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. ऑनलाईन भरलेल्या संगणकीय अर्जाच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यामुळे ऑनलाईन अर्ज बिनचूक भरणे आवश्यक आहे.

(१०.२) ऑनलाईन संगणक अर्ज कोठेही जमा करू नये, विभागीय केंद्रावर प्रत्यक्ष प्रवेश अर्ज पडताळणी करते वेळी सदर अर्ज व मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सोबत आणावीत.

(१०.३) संगणक अर्जात लिहिलेला अनुभव, पदवी / पदव्युत्तर पदवीच्या गुणांची टक्केवारी गुण व श्रेणी आणि प्रवर्गाच्या आरक्षणाआधारेच प्रवेश अर्ज पडताळणी यादी निश्चित होते. प्रवेश पडताळणी यादी प्रसिद्ध करणेपुर्वी अर्जदारांना एकदा आपल्या भरलेल्या प्रवेश अर्जातील त्रुटी दूर करण्याची संधी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर देण्यात येते. त्यानंतर कोणत्याही स्वरूपाची तक्रार (ऑब्जेक्शन) विचारात घेतले जात नाही. विभागीय केंद्रावर प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीची पडताळणी करूनच गुणवत्ता यादीनुसार प्रवेश कायम करण्यात येतो. अर्जदाराने प्रवेशार्थीने दिलेली माहिती वा कागदपत्रे खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास, सदर अर्जदाराचा प्रवेश रह करून शुल्कही परत केले जात नाही. तसेच त्यावर फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येतो याची नोंद घ्यावी. (१०.४) शिक्षक म्हणून अनुभव लिहितांना तो दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंतचा नोंदवावा. संगणक अर्जावर केवळ तुमच्या एकूण सेवा कालावधीची (पुरावे सादर करू शकत असलेल्या) नोंद करावी. एकूण सेवा अनुभवाची नोंद करताना अर्जदाराने नोकरीसंदर्भात सुरुवातीपासून आपणाकडे उपलब्ध असलेल्या पुराव्याप्रमाणे नोंद करावी. अनुभवाचा पुरावा म्हणून सेवेचे प्रमाणपत्र हे दस्तऐवज मान्य करण्यात येत नाही. ज्या सेवेचे पुरावे उदा. सेवा पुस्तिकेतील नोंद, सेवा ऑर्डर इ. उमेदवाराकडे नाहीत त्याची नोंद संगणकीय अर्जातील अनुभव नोंद तक्त्यात करू नये.

(१०.५) पूर्वीची सेवा अर्धवेळ असल्यास अनुभव नोंद तक्त्यात अनुभव नोंदविताना तसा स्पष्ट उल्लेख करावा. यासंदर्भात ‘शिक्षणक्रम प्रवेश-पात्रता’ मुद्दा क्र.८.३ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

(१०.६) संगणक प्रवेश अर्जावरील ‘जिल्हा’ या ठिकाणी तुम्ही ज्या शाळेत सेवेत असाल त्या शाळेचा जिल्हा नोंदवावा, अर्जदाराची शाळा ज्या जिल्ह्यात असेल त्याच जिल्ह्यात अर्जदाराला प्रवेश घेता येतो. बी.एड.चे प्रवेश हे

जिल्हानिहाय तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार करण्यात येतात. (१०.७) अर्जदाराने ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीचे पुरावे कागदपत्र पडताळणी वेळी सदर समितीला संबंधितांनी सादर करणे अनिवार्य असते.

(१०.८) कागदपत्र पडताळणी गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी निवड झाल्यास अर्जदाराने आपण online अर्जात भरलेल्या सर्व माहितीचा पुरावा देणारे तसेच सेवा सत्यता पडताळणीसाठीची प्रमाणित कागदपत्रे विभागीय केंद्रावर होणाऱ्या कागदपत्र पडताळणीसाठी सोबत आणावीत. ती न आणल्यास अर्जदाराची कागदपत्र पडताळणी होणार नाही व संबंधित अर्जदार प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडेल याची नोंद घ्यावी.

* मूळ प्रवेश अर्ज व ऑनलाईन संगणकीय अर्जाची प्रत आणि डी.एड./डी.टी.एड./ उत्तीर्णतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र

* शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती.

* प्रवेश-अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक विद्यालयातील सुरुवातीपासून पुढील सर्व नेमणुकीच्या

आदेशांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती, तसेच अनुभवाचे मूळ प्रमाणपत्र. मागासवर्गीय असल्यास पुढे नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रत व प्रमाणित सत्यप्रत. *

अनुसूचित जाती (एस.सी.) जातीचा दाखला

अनुसूचित जमाती (एस.टी.) जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र

विमुक्त जमाती / भटक्या जाती / इतर मागासवर्गीय / विशेष मागासवर्गीय

(VJ/NT/OBC/SBC) जातीचा दाखला, ऑनलाईन संगणकीय अर्जात नमूद केलेल्या नावाचे अर्जावर असलेल्या नावाचे वैध कालावधीचे नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र आवश्यक. (आरक्षण शासन निर्णयानुसार बदल होऊ शकतात.)

* SEBC आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न संबंधित वर्षात आठ लाखापेक्षा कमी असल्याचा संबंधित अधिकाऱ्याचा प्रमाणित दाखला.

* जन्मतारखेचा पुरावा दर्शविणारी कोणत्याही प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत. * सर्व सेवेचे नेमणूक आदेश, शिक्षणाधिकारी / शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा

पदमान्यता पत्राच्या सुरुवातीपासूनच्या सर्व साक्षांकित प्रती, शाळा मान्यतापत्र.

• मेंटॉर (वरिष्ठ शिक्षक) मान्यता प्रमाणपत्र,

* शाळा अनुदानित असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती. • सेवापुस्तिकेतील संबंधित नोंदी. (संपूर्ण सेवापुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी)

• नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र. • सामाजिक आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांना

दिव्यांग : किमान ४०% दिव्यांग असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र.

प्रकल्पग्रस्त : जिल्हा पुनर्वसन अधिकारी / सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र,

परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक.

आपत्तीग्रस्त उपविभागीय अधिकारी /तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक.

स्वातंत्र्य सैनिक पाल्य पत्नी मुलगा / अविवाहित मुलगी यांनी स्वातंत्र्यसैनिकाच्या

ओळखपत्राची प्रत व पाल्याच्या नातेसंबंधाचा पुरावा.

आजी / माजी सैनिक पाल्य सैनिकाची पत्नी / मुलगा / अविवाहित मुलगी यांना जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक, नातेसंबंधाचा पुरावा आवश्यक, डिस्चार्ज पुस्तक आवश्यक.

विधवा : महानगरपालिका / नगरपालिका / ग्रामपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र,

घटस्फोटिता: विवाहनोंदणी दाखला किंवा न्यायालयाचे घटस्फोटाबाबतचे आदेश किंवा मुस्लीम महिलांच्या बाबतीत नियमाप्रमाणे निकाह लावणारे काझी / इमामांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र. ते प्रमाणपत्र नोटरी करून मराठी भाषेत भाषांतर करून आणणे आवश्यक.

गोवा- बेळगाव बिदर हा मराठी भाषिक प्रदेश असल्याने या उमेदवारांनी नियुक्ती आदेश व अनुभवाचे दाखले हे मराठी / हिंदी / इंग्रजीत आणावे व त्यावर संबंधित अधिकारी / मुख्याध्यापकाची सही व शिक्का आणणे अनिवार्य असेल.

मुलाखतीच्या वेळी वरील मूळ व साक्षांकित (Attested) प्रमाणपत्रांआधारे उमेदवाराच्या प्रवेश-अर्जातील माहितीची सत्यता पडताळून पाहण्यात येईल. त्यामु‌ळे उपरोक्त आवश्यक ती

कागदपत्रे उमेदवाराजवळ जवळ नसल्यास प्रवेश दिला जाणार नाही.

(१०.०९) संगणक अर्जातून प्राप्त माहितीच्या आधारे प्रवेश अर्ज पडताळणी यादी तयार करण्यात येईल. त्या यादीतील अर्जदारांनी प्रवेशासंदर्भात आपल्या विभागीय केंद्रावर कागदपत्र पडताळणी साठी नियोजित वेळेत सर्व मूळ कागद पत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य असेल.

(१०.१०) केंद्रनिहाय ४१/४२ प्रवेशेच्छृंची प्रवेश निवड यादी (खुला, राखीव प्रवर्ग व सामाजिक आरक्षण) प्रवेशासाठी जाहीर करण्यात येईल. प्रवेश गुणवत्ता यादीतील ज्या अर्जदारांचे कागदपत्र बरोबर आहेत त्याच

अर्जाचा प्रत्यक्ष प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.

संबंधित अर्जदारांनी प्रवेश निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवेशाशी संबंधित डी.यू. पोर्टलवरील अर्ज भरणे, शुल्क भरणे व आपला प्रवेश नियोजित वेळेत अंतिम करणे अपेक्षित असेल. अर्थात विद्यापीठाच्या धोरणानुसार त्यात होणारा सर्व बदल अर्जदारांना बंधनकारक असेल. त्यासंदर्भात विद्यापीठ संकेतस्थळावर प्रवेश गुणवत्तायादी सोबत सूचना दिली जाते. प्रवेश निवड यादी वेळापत्रकासह वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येते, ती बघणे अर्जदाराची जबाबदारी असेल. नियोजित वेळेत प्रवेश न घेणाऱ्या अर्जदाराच्या जागी त्याच प्रवर्गातील प्रवेश निवड यादीतील पुढील अर्जदार प्रवेश अर्ज पडताळणीसह पुढील फेरीत भरण्यात येतील. निवड यादी केवळ विद्यापीठ संकेतस्थळावरच टाकण्यात येईल.

लक्षात ठेवा विभागीय केंद्रावर प्रवेश अर्ज पडताळणीसाठी जाताना मुद्दा क्र. १०.८ मध्ये नमूद केलेली तसेच प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीचा पुरावा देणारी सर्व मूळ कागदपत्रे अर्जदाराने आणणे बंधनकारक आहे. अर्जदाराजवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारेच त्याच्या अर्जाचे पडताळणी करून प्रवेश गुणवत्ता यादीत नाव समाविष्ट केले जाते. राखीव गटातून अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे शासनाने निर्धारित केलेली वैध कागदपत्रे असणे बंधनकारक असेल. कागदपत्र पडताळणी वेळी Online प्रवेश अर्जातील भरलेली माहिती व अर्जदाराजवळ उपलब्ध असलेले पुरावे यांची तपासणी करण्यात येते.

(१०.११) प्रवेश अर्ज पडताळणीनंतर निवड यादीत अर्जदाराचे नाव असल्यास अर्जदाराने नियोजित वेळी शुल्क भरण्यापूर्वी डी.यू. पोर्टलवरील अर्जदार माहितीचा (Othentification) फॉर्म भरणे अनिवार्य असेल,

(१०.१२) प्रत्येक जिल्ह्याला निर्धारित जागा आहेत. प्रवेश अर्जाअभावी त्या भरल्या न गेल्यास त्या विभागातील

उर्वरित जिल्ह्यांच्या संबंधित प्रवर्गातील सर्व अर्जदारांची एकत्रित गुणवत्ता यादी तयारी करून गुणवत्तेनुसार संबंधित प्रवर्गातील उर्वरित जागा नव्याने तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील अर्जदारांच्या जिल्ह्यातच अतिरिक्त जागा म्हणून भरण्यात येतील. हे करताना त्या जिल्ह्यातील जागा ५० पेक्षा जास्त होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल.

(१०.१३) बी.एड. २०२४-२६ शिक्षणक्रमाच्या प्रवेशासंदर्भात आपल्या काही तक्रारी असल्यास त्या b.ed_admission@ycmou.ac.in ह्याच ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. प्रवेशा संदर्भातील तक्रार अर्जाची विद्यापीठ पडताळणी करून योग्य तो निर्णय घेईल, मात्र प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर आलेल्या तक्रार अर्जावर विचार केला जाणार नाही.

या शिक्षणक्रमासाठीच्या निवड यादीबाबत अर्जदारांना केवळ विद्यापीठ संकेतस्थळावरूनच कळवले जाईल. तसेच सदर याद्या विद्यापीठ संकेतस्थळावरूनच प्रसिद्ध करण्यात येतील. तसा मेसेज अर्जदाराला प्रवेशासाठी भरलेल्या ऑनलाईन प्रवेश अर्जात नोंदविलेल्या मोबाईलवर पाठविण्यात येईल. बी.एड. प्रवेशासाठी विद्यापीठ संकेतस्थळ पाहण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल.

(१०.१४) या प्रवेश-अर्ज व त्याची सहपत्रे अर्जदाराने ज्या शैक्षणिक तुकडीसाठी सादर केले असतील त्या तुकडीच्या प्रवेशासाठीच वैध असतील.

(१०.१५) संगणकीय अर्जात जिल्हा संकेतांकाची चुकीची नोंद केल्यास अर्जदाराचा प्रवेशासाठी विचार होणार नाही. यासाठी संगणकीय अर्जात अर्जदाराने आपली शाळा, शाळेचा तालुका व जिल्हा याची नोंद अचूक करावी. बी.एड. प्रवेश याद्या जिल्हानिहाय असल्याने अर्जदाराच्या शाळेची निवड त्याचा तालुका वा जिल्हा चुकीचा नोंदविला तर अर्जदाराचे अभ्यासकेंद्र बदलते. वेगळ्या जिल्ह्यात अर्जदाराला प्रवेश दिला जात नसल्याने सदर अर्जदाराचा दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश झाल्यास तो रद्द केला जातो व शुल्क ही परत केले जात नाही.

लक्षात ठेवा अर्जदाराने बी.एड. शिक्षणक्रमाला अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेतल्यानंतर आपल्या online अर्जाची प्रिंट, प्रवेश शुल्काची ई-चलन पावती आपल्या नोंदणीकृत मेल आयडीवर प्राप्त होईल. तसेच त्याची प्रत स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.

महत्वाचे प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्यानुसार वेळोवेळी दिलेल्या कार्यवाही संदर्भातील सूचना विद्यापीठ संकेत स्थळावर पहाव्यात.

(११) निवड-प्रक्रिया

(११.१) सदर शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना केवळ ऑनलाईन संगणकीय अर्जात

भरलेल्या माहितीचा विचार केला जातो. उदाहरणार्थ सेवाज्येष्ठता, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि अतिरिक्त पदवीचे गुण इत्यादी. आरक्षणासंदर्भात संगणक अर्जातील माहिती व शासन नियमांचे पालन करण्यात येते. (११.२) प्रवेश गुणवत्ता यादी करताना प्रथम अनुभवानुसार पायाभूत गुण देण्यात येतात. २०२४-२६ तुकडीसाठी सेवा अनुभव नोंदवण्याचा दिनांक ३० एप्रिल २०२४ पर्यंत असेल. प्रत्येक वर्षासाठी एक गुण असे एकूण जितक्या वर्षांचा अनुभव असेल तितके गुण मिळतील. एका वर्षापेक्षा कमी कालावधीचे गुण ठरविताना जर अनुभव सहा महिने किंवा अधिक असेल तर एक गुण धरण्यात येईल. त्यापेक्षा कमी महिन्यांच्या सेवेला गुण देण्यात येणार नाहीत. अर्धवेळ काम करणाऱ्या शिक्षकांची शिक्षणक्रम प्रवेश पात्रता मुद्यांतर्गत दिल्याप्रमाणे विचारात घेतली जाईल. प्रवेशासाठी मराठीचे पुरेसे ज्ञान अर्जदाराकडे असणे अनिवार्य आहे, त्यासंदर्भात कोणाचीही तक्रार ऐकली जाणार नाही.

(११.३) शैक्षणिक पात्रता वर्ग/ श्रेणी निहाय गुणदान पद्धती

अ. क्र

अ) ‘डी.एड./डी.टी.एड. पदविका शिक्षणक्रम उत्तीर्णता, या शिक्षणक्रमाची अर्हता असल्याने संबंधित शिक्षणक्रम उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र प्रवेशाच्यावेळी सादर करणे अनिवार्य असेल, मात्र त्यास कोणतेही अतिरिक्त गुणदान नसेल.

ब) पदवी, पदव्युत्तर पदवी, किंवा पदवीनंतरची अतिरिक्त एक वर्षाची पदविका उत्तीर्ण असणाऱ्या अर्जदाराला त्यात मिळालेल्या गुणांनुसार खालीलप्रमाणे गुण दिले जातात. मात्र त्यासाठी अर्जदाराने त्यासंदर्भातील माहिती ऑनलाईन अर्जात संबंधित रकान्यात भरलेली असणे अनिवार्य असते.

वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रतेच्या वर्ग/ श्रेणीनुसार गुण प्राप्त होण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरतेवेळी संबंधित शिक्षणक्रम उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शिक्षणक्रम / परीक्षा प्रवेशित स्थितीतील माहिती भरू नये.

सूचना : जे अर्जदार पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय श्रेणीमुळे प्रवेशास पात्र होतील त्यांना संबंधित पदव्युत्तर पदवीच्या श्रेणींचे गुण देण्यात येणार नाहीत.

(११.४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केलेले असल्यास बी.एड. प्रवेशासाठी गुणवत्ता यादीमध्ये मिळणारे अतिरिक्त गुण खालीलप्रमाणे प्राप्त होतील. मात्र ऑनलाईन प्रवेश-

अर्जात त्यासंदर्भातील योग्य माहिती भरणे अनिवार्य आहे. एका पातळीवरील एकापेक्षा अधिक शिक्षणक्रम पूर्ण केलेले असले तरी, प्रत्येक स्तरावरील एकाच शिक्षणक्रमाचे गुण प्रवेशासाठीच्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. मात्र online प्रवेश अर्ज भरतेवेळी संबंधित शिक्षणक्रमाचे उत्तीर्णतेचे गुणपत्रक अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.

(११.५) प्रवेश-प्रक्रिया

प्रवेश अर्ज पडताळणी गुणवत्ता यादी तयार करताना यशस्वीपणे भरलेल्या Online अर्जाचाच विचार करण्यात येईल. विभागीय केंद्रावर कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यात प्रथमतः सामाजिक आरक्षण, खुला प्रवर्ग व नंतर राखीव जागांचे प्रवेश होतील. एखाद्या मागासवर्गीय घटकासाठी पुरेसे अर्जदार उपलब्ध न झाल्यास त्या जागा पुढील फेरीत नियमानुसार व गुणवत्तेनुसार इतर मागासवर्गीयांच्या यादीतून संक्रमित पध्दतीने भरण्यात येतील. त्यासाठी शासन नियमानुसार पुढीलप्रमाणे जागांचे संक्रमण असेल.

गट ए अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST)

गट बी- विमुक्त जाती (VJ-A) व भटक्या जाती (NT-B)

गट सी भटक्या जमाती (NT-C) व भटक्या जमाती (NT-D) इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांचा समावेश असेल.

संदर्भ : शा.नि.क्र. टी.ई.एम.-२००६/ (३०६/०६) तांशी १. दि.६ जुलै २००६ (अध्यादेश २००६ ची अधिसूचना). दिव्यांग / आजी-माजी सैनिक / प्रयोगशील शाळा / गोवा, बेळगाव व बिदर त्या त्या संवर्गातील किमान गुणा अखेर आरक्षित जागांवर पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास रिक्त जागा संवर्गानुसार मुक्त समजण्यात येतील व त्या संवर्गातील मूळ गटास दिल्या जातील. त्यानंतरही राखीव प्रवर्गातून जागा शिल्लक राहिल्यास त्या सर्वसाधारण गटातून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. नविन शासन निर्णय (जी. आर) निघाल्यास त्यानुसार यात बदल करण्यात

येईल. (११.६) प्रवेश गुणवत्ता यादीत जर समान गुण असतील तर प्रथम अनुभवाचा आणि नंतर वयानुसार ज्येष्ठता विचारात घेतली जाईल, जर वय समान असेल तर ज्यांनी पदवी अगोदर प्राप्त केली असेल त्यांना प्राधान्य मिळेल. त्यानंतरही समान गुण झाल्यास गुणवत्ताक्रम ठरविण्याचा अधिकार निवड समितीकडे राहोल व तो अंतिम असेल. (११.७) पदवीधर वेतनश्रेणीबाबत पदवीधर वेतनश्रेणी म्हणजे चटोपाध्याय श्रेणी (स्केल), वरिष्ठ निवड श्रेणी (स्केल), मुख्याध्यापक श्रेणी (स्केल) नाही, ज्या प्राथमिक शिक्षकांना शासनाने प्रत्यक्ष पदवीधर वेतनश्रेणी देऊन पाच सात वर्षाच्या आत बी.एड. शिक्षणक्रम पूर्ण करण्याची अट लेखी स्वरूपात घातलेली आहे, अशा शिक्षकांना तसे पत्र दाखवल्यानंतर पदवीधर वेतनश्रेणी मिळाल्यापासून प्रत्येक वर्षासाठी एक अतिरिक्त गुण देण्यात येईल. सदर माहिती बरोबर भरण्याची / तपासण्याची पूर्णतः जबाबदारी अर्जादाराचीच असेल. त्यासंदर्भात कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. ५वी ते १०/१२ वी वर्ग असलेल्या माध्यमिक शाळेत डी.एड. स्केलवर कार्यरत अथवा माध्यमिक शिक्षक नियुक्ती असूनही पाचवी ते सातवी इयत्तांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना जर शासनाने प्राथमिक शिक्षकांची पदवीधर वेतनश्रेणी दिली असेल तर अशा व्यक्तींनी पदवीधर वेतनश्रेणी मिळाल्याची, तसेच ती वेतनश्रेणी मिळून किती वर्षे झालेली आहे त्याची नोंद संगणक अर्जावर करावी. पदवीधर वेतनश्रेणी प्राथमिक शिक्षकांना देण्यात येत असल्याने या योजनेचा लाभ घेणारे सर्व शिक्षक प्राथमिक स्तरात गणले जातील.

पुन्हा एकदा महत्त्वाचे शहरी, ग्रामीण, आदिवासी विभाग, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या सर्व अर्जदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना प्रवेश प्रक्रियेतील कोणतीही सूचना अर्जदारांना पोस्टाने कळविले जाणार नाही. त्यासाठी केवळ वेबसाईटचाच वापर करण्यात येईल. विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रवेशासाठी निवड झालेल्यांची यादी पाहायला मिळेल. जवळच्या सायबर कॅफेतून ती प्राप्त करता येईल. तुम्ही ती न पाहिल्यास त्यास तुम्ही जबाबदार असाल. तसेच अशा अर्जदारांना नंतरच्या फेरीतही प्रवेश गुणवत्ता यादीत कागदपत्र पडताळणीसाठी निवड केली जाणार नाही.

(११.८) यादीमध्ये नाव आहे की नाही ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर कसे पाहाल ?

* विद्यापीठाच्या Home page https://ycmou.digitaluniversity.ac वर बी.एड. प्रवेश प्रक्रिया ह्या पेजवर Click करा. त्यानंतर पुढे कसे जावे याबाबत सूचना अर्जदारास बघायला मिळतील. त्या वाचून त्याप्रमाणे कृती करा म्हणजे आपण आपल्या नावापर्यंत पोहोचाल.

(११.९) बी.एड. प्रवेशानंतर अर्जदाराने प्रवेश अर्जात नोंदवलेल्या मोबाईलवर Password येईल. त्यावर अर्जदाराने Profile तपासून पाहावे, अभ्यासक्रम निवड, नावाच्या संदर्भात जर काही त्रुटी असतील तर तातडीने विभागीय केंद्रावर संपर्क साधावा. प्रोफाईल तपासणीसाठी दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची माहिती / अभ्यासक्रम बदल होत नाही याची नोंद घ्यावी.

(११.१०) बी.एड. ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला बी.एड.च्या द्वितीय वर्षासाठी पुन्हा Online प्रवेश-अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. दुसऱ्या वर्षी आपला बी.एड. प्रवेश पुन्हा निश्चित न करणारे विद्यार्थी दुसऱ्या वर्षाची अंतिम परीक्षा देण्यास अपात्र ठरतात, याची कृपया नोंद घ्यावी.

महत्वाची सूचना- शासनाने वेळोवेळी काढलेले शासन निर्णय (जी.आर.) व विद्यापीठाचे धोरणात्मक निर्णय प्रवेश प्रकियेपूर्वी प्राप्त झाल्यास त्यानुसार केलेला नियमावलीतील बदल सर्व प्रवेशार्थीना बंधनकारक असेल.

(१२) बी.एड. शिक्षणक्रमातील विविध अभ्यासक्रम

अनिवार्य अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य विद्यापीठ मुख्यालयातून विभागीय केंद्राकडे व विभागीय केंद्राकडून अभ्यासकेंद्रांकडे पुरविण्यात येईल. अभ्यासकेंद्रावरून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य प्राप्त होईल. वैकल्पिक अभ्यासक्रम व पूरक अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणक्रम पूर्ततेसाठी त्याचा उपयोग करावा. अध्ययन साहित्य प्राप्ती संदर्भात काही अडचणी असल्यास विद्यापीठाच्या ग्रंथ भांडार कक्ष प्रमुखांशी संपर्क साधावा. त्यांचा Email ID ycmoustore@gmail.com असा आहे.

(एन.सी.टी.ई. नियम व विद्यापीठ धोरणांनुसार या रचनेत होणारा बदल सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल.)

सूचना :- प्रवेश निश्चिती नंतर कोणत्याही अभ्यासक्रमात / वैकल्पिक अभ्यासक्रमात / अध्यापन पध्दतीच्या अभ्यासक्रमात बदल केला जात नाही, ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. त्यामुळे संगणक अर्जात विषयांची नोंद करताना काळजीपूर्वक करावी.

(१३) संपर्कसत्रे रोज घड्याळी ६ तास याप्रमाणे

प्रथम वर्ष ३५ दिवस द्वितीय वर्षे ३५ दिवस

(१३.१) संपर्कसत्र कार्यक्रम व त्यातील उपस्थिती शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रमाची भूमिका प्राधान्याने स्वयं-अध्ययनाची असली तरी हा व्यावसायिक शिक्षणक्रम असल्यामुळे तात्त्विक पाठ्यक्रमांचे मार्गदर्शन, आशयाचे शंकानिरसन, मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके पूर्ण करणे, स्वाध्यायांवरील प्रत्याभरण, कृत्तिसत्रे, उद्बोधन, प्रबोधन इत्यादींसाठी योजनाबद्ध संपर्कसत्रांची आवश्यकता आहे. ही संपर्कसत्रे विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमाच्या नियोजित अभ्यासकेंद्रावर online/offline पद्धतीने आयोजित केले जातात. आपल्या नियुक्त अभ्यासकेंद्रावरच विद्यार्थ्यांनी ते पूर्ण करणे बंधनकारक आहे. अभ्यासकेंद्रासाठी एन.सी.टी.ई. मार्फत राज्यातील प्रथितयश शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची निवड करण्यात आलेली आहे. विद्यापीठाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार या संपर्कसत्राचे आयोजन करण्यात येते. संपर्कसत्रातील छात्राध्यापकांची उपस्थिती व सहभाग

त्यात अनिवार्य असतो.

(१३.२) संपर्कसत्रांना अनुपस्थित राहणा-या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे केंद्रामार्फत अर्ज केल्यानंतर विद्यापीठाच्या

मान्यतेनुसार प्रत्येक दिवसाला रु.५००/- याप्रमाणे विद्यापीठात ज्यादा शुल्क भरावे लागते. ज्यादा शुल्कातील ६० % रक्कम विद्यापीठात, तर ४०% रक्कम अभ्यासकेंद्रावर भरून त्याची पावती विद्यार्थ्याने घेणे अपेक्षित असते. त्यानंतर विद्याशाखेच्या मान्यतेनुसार नियुक्त अभ्यासकेंद्रावर अपूर्ण संपर्कसत्र पूर्ण करता येते. अपूर्ण संपर्कसत्र अभ्यासकेंद्रांची तयारी असल्यास त्याच वर्षी अन्यथा पुढील तुकडीच्या संबंधित संपर्कसत्राबरोबर पूर्ण करता येते. सर्व संपर्कसत्र पूर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी अंतिम परीक्षेला पात्र ठरत नाही. काही छोटी संपर्कसत्रे केंद्र कार्यालयीन दिवशी आयोजित करू शकते, तसे झाल्यास त्यास प्रशिक्षणार्थीना रजा घेऊन उपस्थित राहावे लागते. त्याबद्दल कोणतीही तक्रार विचारात घेतली जात नाही. (१३.३) परीक्षेचे माध्यम प्रात्यक्षिक कार्य व लेखी परीक्षेसाठी इंग्रजी अभ्यासक्रमासाठी

माध्यम इंग्रजी, हिंदी अभ्यासक्रमासाठी माध्यम हिंदी व इतर अभ्यासक्रमासाठी माध्यम मराठी राहील. इत्तर सर्व अभ्यासक्रमांची लेखी परीक्षा व अभ्यासकार्य मराठी भाषेतूनच पूर्ण करावी लागतील. (अपवाद इंग्रजी व हिंदी माध्यमातून लेखन व अंतिम परीक्षेसाठी पूर्वपरवानगी घेणारे विद्यार्थी), प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही माध्यमांत उपलब्ध असतील. मात्र मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका प्रमाण मानण्यात येतील.

सूचना प्रवेश निश्चितीनंतर येणाऱ्या पहिल्या मोठ्या सुट्टीत आपले प्रथम मोठे संपर्कसत्र असेल. नियोजित अभ्यासकेंद्राकडून त्यासंदर्भात प्रवेश झालेल्या विद्याथ्यांना पत्र / मेल / whatsapp ग्रुपवरून कळविले जाते. तसे संप्रेषण आपणाशी न झाल्यास आपण आपल्या नियोजित अभ्यासकेंद्रावर संपर्क साधावा. अर्थात त्यासाठी प्रवेशानंतर आठ दिवसांत आपले नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, फोन नंबर ई-मेल. आय.डी. इ. ची नोंद आपल्या नियुक्त अभ्यासकेंद्रावर करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल.

YCMOU सन 2024-26 बीएड संपूर्ण प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिका Click here 

Join Now