यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशाबाबत वेळापत्रक ycmou addmission timetable
सन 2024-25 मधील प्रवेश
विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत) व बी. एड. (विशेष) या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024- 2025 या २ शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन प्रवेश अर्ज मुदत
ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत मुदत – दिनांक 01.10.2024 ते दिनांक 09.10.2024 पर्यंत
अधिकृत वेबसाईट येथे पहा
विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या website http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहिती पुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत.
शिक्षणक्रमाचे शुल्क बाबत
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.
ऑनलाइन अर्ज
विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
प्रवेशासंबंधी तांत्रिक अडचणी बाबत
प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर (स.10.30 ते सायं. 5.30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून)
खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
विद्यापीठाचे हेल्पलाईन नं- (0253)-2230580, 2230106, 2231714, 2231715
मोबाईल नं.- 9307579874, 9307567182, 9272046725