लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदान अधिकारी क्रमांक दोन यांची कामे work’s of second polling officer
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️केंद्राध्यक्ष यांचे कर्तव्य व जबाबदारी👉 pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.1 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.2 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.3 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
दुसरा मतदान अधिकारी यांचे कामे
दुसरा मतदान अधिकारी कडे पक्की शाई, मतदार नोंदवही (१७अ), मतदार चिड्डी असेल.
मतदान करून देण्यासाठी पक्क्या शाईची खुण करणे तसेच मतदार नोंदवही मध्ये मतदाराची नोंद करून सही अंगठा घेणे व मतदारास मतदार चिट्ठी देणे हे कर्तव्य.
पक्क्या शाईची खूण करणे-
• मतदान अधिकारी २ मतदारांच्या डाव्या हाताची तर्जनी पाहील आणि त्यावर शाईची निशाणी नाही ना याची खातरजमा करील आणि नंतर त्यावर शाईचे चिन्ह करील. हे चिन्ह अशा रितीने करण्यात येईल की शाई नखाच्या मुळात आणि नखावरील कातडीवर पसरेल आणि त्यामुळे तर्जनीवर शाईची स्पष्ट खुण राहील.
• मतदाराने डाव्या हाताची तर्जनी तपासून घेण्यास किंवा खुण करून घेण्यास नकार दिला किंवा अगोदरच खुण असेल तर त्याला मतदान करण्यास परवानगी देऊ नये.
• मतदाराच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत
१. डाव्या हाताच्या तर्जनीवर
२. डाव्या हाताची तर्जनी नसल्यास बाजूच्या इतर बोटावर
३. उपरोक्त दोन्ही नसल्यास उजव्या हाताच्या तर्जनीवर
४. उपरोक्त तीनही नसल्यास उजव्या हाताच्या उपलब्ध बोटावर
५. दोन्ही हात नसल्यास डाव्या किंवा उजव्या हाताच्या उपलब्ध भागाच्या टोकावर
• मतदार नोंदवही (नमुना १७ अ) मतदाराची नोंद करून सही/अंगठा घेणे दुस-या मतदान अधिका-याकडे नमुना १७ मध्ये मतदार नोंदवही (voter regi.) असेल, तो नोंदवहीत ओळख पटविलेल्या मतदारांची नोंद ठेवील व मतदाराची नोंदवहीवर स्वाक्षरी अथवा अंगठयाचा ठसा घेईल.
• मतदाराच्या फोटो ओळखपत्राच्या/ओळख पुराव्याच्या प्रकाराच्या व क्रमांकाच्या नोंदी मतदार नोंदवहीत घेईल.
• मतदाराने नोंदवहीवर स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा करण्याचे नाकारल्यास त्याला मतदान करू देऊ नये.
• मतदार सही करू शकत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा ठसा घ्यावा. तो साक्षांकित करण्याची गरज नाही.
• मतदाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल तर उजव्या हाताचा अंगठा घेण्यात यावा. दोन्ही हाताचे अंगठे नसतील तर डाव्या हाताच्या तर्जनी पासुन सुरवात करून कोणत्याही एका बोटाचा ठसा घेण्यात यावा. डाव्या हाताला बोटे नसतील तर उजव्या हाताच्या बोटांचा ठसा घेण्यात यावा. जर त्याला बोटे नसतील तर मत नोंदविणे सहज शक्य नसल्याने सोबत्याची सही किंवा अंगठा घ्यावा व शेरा कॉलम मध्ये तसे नमूद करावे.
• मतदाराची स्वाक्षरी म्हणजे साक्षर मतदाराचे बाबतीत नाव व आद्याक्षरे. • ASD मतदारांचे बाबतीत सही सोबत अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा.
• CSV मतदाराने नियुक्त केलेल्या Proxy मतदाराचे मत नोंदविण्यापुर्वी अशा मतदाराचा CSV मतदार यादीतील क्रमांक कॉलम २ मध्ये नमूद करावा. व कंसात PV नमुद करून अशा मतदाराच्या मधल्या बोटावर शाईची खुण करण्यात यावी.
• मतदार नोंदवही नमुना १७ अ मधिल नोंदी
१) मतदारांची नोंदवही (नमुना १७ अ) मध्ये प्रथम मतदार स्वाक्षरी करण्यापुर्वी मतदान अधिकारी, मतदान केंद्राध्यक्षसह नोंदवही तपासुन घेईल. आणि नमुना १७ अ मध्ये “नियंत्रण युनिट तपासणी केली आहे. व एकूण शुन्य असल्याचे आढळले आहे” अशी शाईने नोंद करेल.
२ ३ ) पहिल्या रकान्यात अनुक्रमांक १ ने सुरवात करून लागोपाठ क्रमाने अनुक्रमांक लिहावे. ) दूसऱ्या रकान्यात मतदाराचा मतदान यादीतील अनुक्रमांक नमुद करावयाचा आहे.
४) तिसऱ्या रकान्यात मतदाराने EPIC द्वारे ओळख पटविली असेल तर त्याबाबतीत EP, मतदान छायाचित्र असेल तर क्रमांक लिहण्याची गरज नाही. इतर पुराव्याच्या बाबतीत दाखविलेल्या पुराव्याच्या क्रमांकाचे शेवटचे चार अंक नमूद करावेत. तसेच पुराव्याचा प्रकार नमुद करावा.
५) चौथ्या रकान्यात स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा.
६) पाचव्या रकान्यात आवश्यकतेनुसार मतदानास नकार, गोपनीयता भंग, EDC मतदार, Test Vote अशा नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यात याव्यात.
७) मतदान प्रकिया संपल्यानंतर शेवटचे मतदाराचे नोंदीखाली लाल शाईने आडवी रेघ ओढून त्याखाली “नमुना १७ अ मधिल शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक…. असा आहे.” अशी नोंद करून केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी करावी.
• मतदाराला मतदार चिठ्ठी देणे-
मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या शाईची खुण केल्यानंतर त्याच्याशी संबंधित नोंद मतदार यादीत घेतल्या नंतर आणि त्या नोंदवहीत सही / अंगठा घेतल्यानंतर दुसरा मतदान अधिकारी त्या मतदारासाठी मतदार चिट्ठी देईल.
मतदान साहित्यात मतदार चिठ्ठ्या पुरविण्यात येतील.
मतदाराला मतदार चिट्ठी दिल्यानंतर CU चा प्रभारी असलेल्या तिसऱ्या मतदान अधिकारी कडे मतदारास जाण्यास निर्देश करील.
मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारी कडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरविण्यात आलेल्या लिफाफ्यात मोहोरबंद करून साहित्यात संकलन केंद्रावर जमा केल्या जातील.