लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 केंद्राध्यक्षांची कामे work’s of presiding officer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 केंद्राध्यक्षांची कामे work’s of presiding officer 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🖥️केंद्राध्यक्ष यांचे कर्तव्य व जबाबदारी👉 pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🖥️मतदान अधिकारी क्र.1 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🖥️मतदान अधिकारी क्र.2 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🖥️मतदान अधिकारी क्र.3 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

मतदान केंद्राध्यक्ष जबाबदारी – मतदान केंद्र परिसर मतदान पथक

work's of presiding officer
work’s of presiding officer

शिस्तबद्धपणा व निपक्षःपातीपणा. प्रत्येक मतदाराशी सौजन्यपुर्वक व्यवहार करणे. प्रचारास बंदी- मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत प्रचार करणे गुन्हा आहे.

उमेदवार निवडणूक मंडप (बुथ)-

१) २०० मीटर अंतराच्या पलीकडे

२) एक टेबल व दोन खुर्च्य

३) छत्री किंवा ताडपत्री

उल्लंघन केल्याचे आढळल्यास क्षेत्रीय अधिकारी/पोलिस अधिकारी यांचे निदर्शनास आणावे.

• मतदान केंद्रामध्ये किंवा आसपास गैरशिस्त वर्तन-गुन्हा आहे.

बेशिस्त व्यक्तिस मतदान केंद्रातून बाहेर काढावे.

• मतदारांना नेण्या-आणण्यासाठी उमेदवार कडून वाहतुकीची साधने वापरणे बेकायदेशीर-तक्रारदार कडून तक्रार प्राप्त झाल्यास क्षेत्रिय / क्षेत्र दंडाधिकारी मार्फत संबंधित उपविभागीय दंडाधिकारी कडे पाठवावी.

मतदान केंद्रातून मतदान यंत्र आणि इतर मतदान साहित्य बाहेर नेणे हा-गुन्हा आहे.

• मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सेलफोन, स्मार्ट घड्याळ, कार्डलेस फोन, वायरलेस संच वापरण्यास परवानगी नाही. तथापि केंद्राध्यक्ष व सूक्ष्म निरीक्षक यांचा भ्रमणध्वनी ध्वनिविरीहीत अवस्थेत (silent mode) मतदान केंद्रात नेण्यास व बाळगण्यास परवानगी.

• मतदान केंद्रात किंवा मतदानकेंद्राजवळ हत्यारे घेऊन जाण्यास प्रतिबंध.

• निवडणूक अधिकारी यांनी पदीयकर्तव्याचा भंग केल्यास दखलपात्र अपराध.

मतदान केंद्राध्यक्ष विविध टप्प्यावरील कामांची रूपरेषा

१) नियुक्ती झाल्यानंतर

Work's of presiding officer
Work’s of presiding officer

• सर्व प्रशिक्षण वर्गाना न चुकता उपस्थित राहावे.

• आपणास पुरविण्यात आलेले निवडणूक विषयक संदर्भ साहित्य अतिशय काळजीपूर्वक वाचून घ्या.

• प्रशिक्षणात सांगितलेल्या सुचना काळजीपूर्वक ऐकाव्यात.

■ CU, BU, VVPAT ची हाताळणी प्रथम व द्वितीय प्रशिक्षण दरम्यान वारंवार करावी.

• निवडणूक विषयक सर्व तरतुदी, नियम व संविधानिक व असंविधानिक नमुने काळजीपूर्वक अभ्यासा.

• मतदान केंद्राध्यक्क्षासाठी निर्देश पुस्तिका, EVM व VVPAT च्या निर्देश पुस्तिकेतील सूचनांचा

काळजीपूर्वक अभ्यास करावा. • टपाली मतदान किंवा निवडणूक कार्य प्रमाणपत्र बाबत अर्ज सादर करावा.

• आपल्या शंका-कुशंकाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांचेकडून पुर्ण समाधान करून घ्यावे.

• निवडणूक साहित्याशी पुर्ण परिचित व्हावे.

२) मतदान दिवसाच्या अगोदरच्या दिवशी

Work's of presiding officer
Work’s of presiding officer

• मतदान केंद्र नियुक्ती आदेश प्राप्त करून घ्या. सर्व पथकासह साहित्य वितरण टेबलवरून साहित्य ताब्यात घ्या. आदेशात नमूद क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

• नियुक्त केलेल्या मतदान केंद्राचेच साहित्य मिळाल्याची खात्री करा. त्यासाठी BU, CU व VVPAT वरील अनुक्रमांक व ऐड्रेस स्टॅग तपासणी करून घ्या.

• कंट्रोल युनिटचे कॅन्डीडेट सेट विभाग व्यवस्थित मोहोरबंद केल्याची खात्री करा.

• बॅलेट युनिट यथोचितरित्या मोहोरबंद केले आहे. व मतपत्रिका योग्यरीत्या लावल्याची खात्री करा.

• बॅलेट युनिट चे थम्ब व्हील बटण योग्यस्थितित असल्याची खात्री करा.

• जोडपत्र ३ नुसार सर्व साहित्याची तपासणी करून घ्या.

• चिन्हांकित मतदार यादीच्या प्रती, प्रमाणपत्र, मतदार संख्येसह बरोबर असल्याची खात्री करा.

• निवडणूक लढवणाऱ्या मतदारांची यादी, ASD, CSV यादी मिळाल्याची खात्री करा.

• बाणफुलीचे रबरी शिक्के, धातूची मोहोर, शाईची बाटली तपासणी करून घ्या.

• मतदान केंद्रावर जाण्याचा, येण्याचा मार्ग व वाहतुकीचे साधन माहिती करून घ्या. व नियुक्त केलेल्या वाहनातूनच क्षेत्रिय अधिकारी परवानगी घेऊन मतदान साहित्यासह प्रवास करावा.

३) मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात आल्यावर

Work's of presiding officer
Work’s of presiding officer

• मतदान साहित्य आपसात वितरीत करून घ्या.

• मतदान प्रतिनिधी नियुक्ती पत्र तपासुन पहा. त्यांना गोपनियतेच्या तरतुदी समजावून सांगा. • तुमच्या पथकातील मतदान अधिकारी अनुपस्थित असल्यास क्षेत्रीय अधिकारी यांना कळवा.

• मतदान सुरु करण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान ९० मिनिटे अगोदर अभिरूप मतदान (मॉकपोल) सुरु करा.

• चाचणी मतदान नंतर CU वरील अभिरूप मतदानाची माहिती काढून टाका. VVPAT ड्रॉप बॉक्स मधिल अभिरूप मतदानाच्या चिठ्ठ्या काढून मोहोरबंद केल्याची खात्री करा. अभिरूप मतदान प्रमाणपत्र तयार करा. त्यावर मतदान प्रतिनिधी स्वाक्षरी घ्या.

• कंट्रोल युनिट्चा चा Result विभाग कागदी हिरवी मोहोर लावुन मोहोरबंद करा. VVPAT चा ड्रॉप बॉक्स ऐड्रेस स्टॅग लावुन सिलबंद करा.

• मतदान अधिकारी २ कडील मतदाराची नोंदवही (नमुना १७ अ) मध्ये “नियंत्रण युनिट तपासणी

केली आहे. व एकूण शुन्य असल्याचे आढळले आहे” शेरा नमूद करून स्वाक्षरी करा.

 

४) मतदान चालु असताना-मतदान कालावधीत

Work's of presiding officer
Work’s of presiding officer

• नेमून दिलेल्या वेळेतच मतदान चालु होईल याची खात्री करा. • दैनंदिनी मध्ये वेळोवेळी नोंदी घेऊन दैनंदिनी अद्ययावत ठेवा.

• दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी गोळा करा.

• मतदान काही मिनिटे उशिरा सुरु झाले तरीही ठरवून दिलेल्या वेळेतच बंद करा. त्यावेळी मतदान केंद्रावरील रांगेत असलेल्या मतदारांना तुमची स्वाक्षरी असलेल्या चिठ्ठ्या द्याव्यात.

• मतदान सुरु असताना काही बाबतीत वेळोवेळी आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.

१) एखाद्या मतदाराकडून आक्षेप

२) अल्पवयीन मतदाराकडुन मतदान

३) अंध किंवा अपंग मतदाराचे मतदान

४) मतदाराने मतदान करण्यास नकार देणे.

५) प्रदत्त मते

६) मतदानाच्या गोपनीयतेचा भंग

७) तोतयेगिरीला प्रतिबंध

८) VVPAT कागदी चिट्ठीवर छापलेल्या तपशिल बाबत तक्रार

 

५) मतदान पुर्ण झाल्यानंतर

Work's of presiding officer
Work’s of presiding officer

• मतदानाची अंतिम आकडेवारी तसेच स्त्री पुरुष मतदान आकडेवारी तपासुन घ्या.

• मतदान यंत्र व VVPAT निर्देशानुसार मोहोरबंद करा. •

मतदान छायाचित्र ओळखपत्र शिवाय आणि पर्यायी कागदपत्रासह मतदान केलेल्या व ब्रेललिपीतील मतपत्रिका वापरून मतदान केलेल्या, ASD यादीतून मतदान करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मतदारांसह मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या किती ते पहा.

• नोंदविलेल्या मतांचा हिशोब (१७ सी) तयार करून त्याच्या प्रती मतदान प्रतिनिधी यांना देऊन त्याबाबत प्रतिज्ञापत्र वर पोहोच घ्या.

• सर्व निवडणूक विषयक कागदपत्रे संविधानिक, असंविधानिक तयार करून लिफाफे मोहोरबंद करा. • सर्व साहित्य बरोबर घेतल्याची खात्री करून संकलन केंद्राकडे नियुक्त वाहतूक आराखडा नुसार निघावे.

• टेबलनिहाय ठरवून दिलेले साहित्य जमा करून त्याची पोहोच घ्यावी. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून कार्यमुक्ती आदेश घेऊनच संकलन केंद्र सोडावे.

 

मतदान कक्षात प्रवेश करण्याचा केंद्राध्यक्षाचा विशेषाधिकार

Work's of presiding officer
Work’s of presiding officer

• खालील प्रसंगी मतदान केंद्राध्यक्ष यांना मतदान कक्षामध्ये उपस्थित मतदान प्रतिनिधी समवेत प्रवेश करता येईल. याबाबत मत नोंदविणाऱ्या मतदारास पूर्वसूचना द्यावी.

१) मतदान युनिट (BU) व्यवस्थित पणे चालु नाही. अशी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी ३ यांची खात्री पटल्यास.

२) मतदान कक्षात प्रवेश केलेला मतदार मतदार युनिट मध्ये (BU) गैरप्रकार करत आहे. किंवा त्यात व्यत्यय आणत आहे.

३) एखादा मतदार कागद, चिकटपट्टी इ मतदान युनिट वर चिकटवून एखादी खोडसाळ गोष्ट करत असेल.

४) मतदार मतदान कक्षात अवाजवी विलंब करत आहे. असा संशय आल्यास किंवा संशय घेण्यास पुरेसे कारण असल्यास मतदान युनिटची तपासणी करण्याकरिता, मतदान प्रकिया सुरळीत व व्यवस्थित

५ चालु आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी मतदान कक्षात प्रवेश करण्याचा विशेषअधिकार आहे. ) VVPAT मधिल पेपर स्लिप बाबत मतदाराने केलेल्या आक्षेपाची खातरजमा करण्यासाठी.

तथापि एखादया निरक्षर मतदाराने मतदान कसे करावे याबाबत मदत मागितल्यास मतदान कक्षात प्रवेश करुन मतदान प्रक्रिया समजुन सांगता येणार नाही. अशा वेळी पुठ्यावरील छापील बॅलेट युनिटच्या नमुन्याचे (Dummy BU) मदतीने मतदानाची प्रक्रिया समजुन सांगेल.