लोकसभा निवडणूक 2024 पहिला मतदान अधिकारी कामे work’s of first polling officer
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️केंद्राध्यक्ष यांचे कर्तव्य व जबाबदारी👉 pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.1 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.2 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️मतदान अधिकारी क्र.3 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पहिला मतदान अधिकारी कामे

प्रथम मतदान अधिकारी कडे चिन्हांकित मतदार यादी असेल.
मतदाराची ओळख पटविण्याची जबाबदारी त्याची असेल.
मतदार प्रथम या मतदान अधिका-याकडे जाईल. व स्वतःचे नाव सांगेल किंवा BLO/उमेदवार यांनी दिलेली मतदाराचे नाव व अनुक्रमांक नमूद असलेली ओळखचिट्ठी दाखविल. तथापि मतदान अधिकाऱ्यांना अशा ओळखचिट्ठीची सक्ती करता येणार नाही.
मतदाराचे मतदार यादीतील नाव शोधुन मतदान अधिकारी १ मतदाराला ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगतील. निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार ओळखपत्र वा ओळखीसाठी आवश्यक इतर पुरावे अनिवार्य केलेले आहेत. (प्रत्येक निवडणुकीवेळी आयोग इतर ओळखीचे पुरावेबाबत आदेश जाहीर करील.)
* पुरावा दिला नसल्यास मतदाराला मत नोंदविण्यासाठी परवानगी देऊ नये.

मतदाराच्या नावाचा तपशिल मतदान अधिकारी मोठ्याने वाचून दाखवतील. ज्याद्वारे उपस्थित प्रतिनिधी यांना मतदाराचे ओळखीबाबत खात्री करून घेता येईल.
मतदाराची फोटो ओळखपत्रावरून किंवा ओळखिच्या इतर पुराव्यावरून ओळख पटल्यानंतर अशा मतदाराचे चिन्हांकित मतदार यादीतील नाव लाल शाईने तिरपी रेषेत काट करेल.
* पुरुष व स्त्री मतदारांची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी स्त्री मतदारांच्या अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल. आणि तृतीय पंथी मतदारांच्या अनुक्रमांक जवळ एक चांदणी (STAR) खुण करण्यात येईल.
* फक्त व्होटर सुचना स्लिप (Voter Information Slip) च्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही. VIS घेऊन येणाऱ्या मतदारास ओळखपत्र किंवा इतर ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
मतदान केंद्रावर पडदानशीन (बुरखाधारी) महिला मतदार पुरेसे असतील तर त्या महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला मतदान अधिकारी यांची नेमणक केली जाईल.
सत्यमेव जयते

विशेष प्रसंगी पहिला मतदान अधिकारी कार्यवाही
* एखादी व्यक्ती मतदान ओळखपत्रसह आली तरी देखील त्याचे/तिचे नाव मतदार यादीत नसेल तर ती व्यक्ती मतदान करू शकत नाही.
* ज्या मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या आहेत, AVSC, AVPD, AVES, AVCO मतदार बाबत चिन्हांकित मतदार यादीत PB म्हणुन चिन्हांकित केले असेल तर मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी देता येणार नाही.
* मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप आल्यानंतर अशा मतदाराला व आक्षेपकाला मतदान केंद्राध्यक्षकडे पाठवावे.
* परदेशी (Oversees) मतदारांसाठी त्यांची ओळख मूळ पारपत्र (passport) आधारेच पटविता येईल.
* मतदाराच्या ओळखीविषयी खात्री झाली असेल तर मतदारांच्या यादीत मतदाराच्या नावांच्या नोंदीसंबंधी झालेल्या केवळ लिपिकीय दोषांकडे किंवा छपाईच्या चुकांकडे दुर्लक्ष करावे.
* राजकीय पक्ष/उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांनी मतदारांना दिलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्यावर उमेदवाराचे नाव, पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह असू नये. मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी यांच्या लक्षात आणून द्यावी. असे प्रकार ताबडतोब थांबविण्यास सांगावे. उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडून देण्यात आलेली चिट्ठी ओळख पटविण्याचा मान्यताप्राप्त दस्तऐवज नाही.
3 thoughts on “लोकसभा निवडणूक 2024 पहिला मतदान अधिकारी कामे work’s of first polling officer ”