शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत work evaluation report 

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत work evaluation report

शासन परिपत्रक

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी याबाबतची सूचना शासन परिपत्रक दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

२. महापार हे संकेत स्थळ आतापर्यंत सर्व Internet वर उपलब्ध होत होते. तथापि, दिनांक १ ऑगस्ट, २०२४ पासून सदर संकेतस्थळ केवळ NICNet किंवा State Wide Area Network (SWAN-DIT) या Internet वर उपलब्ध आहे, अशा सूचना NIC, Data Centre, Delhi यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. सदर सुविधा NIC केवळ WebVPN द्वारा उपलब्ध करुन देणार आहे. WebVPN ही सुविधा बहुतांशी अधिकारी/कर्मचारी यांना उपलब्ध झाली नसल्याने ३७% PAR महापार संगणक प्रणालीत अद्यापही प्रलंबित आहेत.

महापारमध्ये कार्यमूल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे [विशेषतः WebVPN ही सुविधा काही अधिकारी/कर्मचारी (Users of MahaPAR) यांना उपलब्ध झाली नसल्याने] कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी १ महिन्याची म्हणजेच दिनांक ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतवाढ अंतिम असेल.

महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन २०२३-२४ या वर्षाचे गोपनीय

३. अहवाल दिनांक ३१ जानेवारी, २०२५ रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येतील.

४. वर नमूद केलेल्या वेळेत ही सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांची राहील.

हे ही वाचा

जुनी पेन्शन बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय

अपार दिवस साजरा करण्याबाबत शासन निर्णय

NAS परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत प्रश्नपेढी उपलब्ध

52 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक

सातव्या वेतन आयोगातील त्रुटी निवारणासाठी मुदतवाढ

ब्लेंडेड मोड कोर्स साठी मदतवाढ परिपत्रक

५.सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२४११२६१६०६४५७९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now