शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न (Aadhar Seeded) करण्याबाबत white rashan card

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न (Aadhar Seeded) करण्याबाबत white rashan card

संदर्भ : १) सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. मफुयो २०२३/ प्र.क्र.१६०/आरोग्य ६, दि.२८.०७.२०२३

२) राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) यांचे दि.१६.५.२०२४ चे पत्र

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२६.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दि.२८.०७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

 

२. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे

आवश्यक आहे. करिता, शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची

कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

शासन निर्णय pdf download

 

Leave a Comment