मतदान साहित्य घेतांना हे तपासण्यास विसरु नका votting sahitya checking 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान साहित्य घेतांना हे तपासण्यास विसरु नका votting sahitya checking 

निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या नमुना स्वाक्षरीच्या प्रती मतदान प्रतिनिधींची ओळख पटविण्यासाठी प्राप्त झाल्या आहेत.

प्रदत्त मतपत्रिका तुमचे मतदान केंद्र ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघाच्याच आहेत. तसेच त्या क्रमवार असून त्यामध्ये खराब मतपत्रिका नाहीत.

पक्क्या शाईचे पेन मिळाले आहेत व पेनमध्ये पुरेशी शाई आहे.

विभेदक चिन्ह असलेला रबरी शिक्का आपल्याच मतदान केंद्राचा आहे.

बाणफुलीचा शिक्का दोन्ही बाजूच्या चिन्हासह मिळाला आहे. (प्रदत्त मतपत्रिकेसाठी/Tender Vote)

फोटो मतदार यादीच्या (Photo Electoral Roll) तीनही चिन्हांकित प्रती एकसारख्या आहेत.

चिन्हांकित प्रतीवर दिव्यांग मतदार, वय वर्षे ८५ वरील मतदार ज्यांनी टपाली मतदानाचा पर्याय वापरलेला आहे, इडीसी व इतर टपाली मतदानाखेरीज इतर कोणतीही खूण नाही.

फोटो मतदार यादीच्या चिन्हांकित प्रती बरोबर गैरहजर, स्थलांतरीत व मयत मतदारांची यादी (ASD) देण्यात आली आहे.

मतदार यादीच्या पुरवणीनुसार नावे वगळणे व इतर दुरुस्त्या मतदारयादीत केल्या आहेत.