मतदान साहित्य घेताना मतदान यंत्रांची तपासणी कशी करावी? Votting sahitya 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान साहित्य घेताना मतदान यंत्रांची तपासणी कशी करावी? Votting sahitya 

EVM व VVPAT आपल्याच मतदान केंद्राचे आहे याबाबत ADDRESS TAG पाहून खात्री करा.

CU ची बॅटरी व कैंडसेट सेक्शन ADDRESS TAG ने सील केले आहेत याची खात्री करा.

BU चा थंबव्हील पहिल्या युनिटसाठी 01 वर आहे व दुसरे युनिट असल्यास त्याचा 02 वर आहे, याची खात्री करा.

VVPAT चा मागचा पेपर लॉक नॉब आडवा (Transportation Mode मध्ये) आहे याची खात्री करा,

VVPAT चा पेपर रोल सेक्शन सीलबंद केला असून त्यास आपल्या मतदान केंद्राची पत्त्याची खूणचिठ्ठी असल्याची खात्री करा.

कंट्रोल युनिटच्या मागील बाजूस असलेला ‘ऑन ऑफ स्वीच’ चालू करुन बॅटरी चालू असल्याची खात्री करा व सदर स्वीच न चुकता बंद करा.

BU आपल्याला सीलबंद मिळेल. त्यामध्ये आपल्यास कोणताही बदल करता येणार नाही.

BU चे वरचे व खालचे सील तपासून पहा. आपल्या मतदान केंद्राचाच Address Tag लावलेला आहे, याची खात्री करा.

पिंक पेपर सील सुस्थितीत आहे, याची खात्री करा.

हे तपासण्यास विसरु नका

फोटो मतदार यादीच्या (Photo Electoral Roll) तीनही चिन्हांकित प्रती एकसारख्या आहेत.

चिन्हांकित प्रतीवर दिव्यांग मतदार, वय वर्षे ८५ वरील मतदार ज्यांनी टपाली मतदानाचा पर्याय वापरलेला आहे, इडीसी व इतर टपाली मतदानाखेरीज इतर कोणतीही खूण नाही.

फोटो मतदार यादीच्या चिन्हांकित प्रती बरोबर गैरहजर, स्थलांतरीत व मयत मतदारांची यादी (ASD) देण्यात आली आहे.

मतदार यादीच्या पुरवणीनुसार नावे वगळणे व इतर दुरुस्त्या मतदारयादीत केल्या आहेत.