मतदान वेब कास्टिंग संदर्भात महत्वाच्या सूचना voting web casting instructions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान वेब कास्टिंग संदर्भात महत्वाच्या सूचना voting web casting instructions

> ARO स्तरावर WEB Casting चे मतदान केंद्र ठरवुन त्याद्वारे आपल्या कार्यवाहीवर नजर ठेवली जाईल.

> वेब कास्टिंग कॅमेरा जमिनीपासून पुरेशा उंचीवर (७ ते ८ फुट) लावावा.

> सदर कॅमेरा स्थिर व मजबूत स्टॅण्ड/ जागेवर ठेवावा.

सदर चित्रिकरणात खालील बाबी स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे.

1. मतदाराची ओळख पटवण्याची प्रक्रिया

2. मतदाराच्या बोटास शाई लावण्याची प्रक्रिया

3. मतदाराची ओळख पटविल्यानंतर ईव्हीएमवर बॅलेट देण्याची प्रक्रिया

4. मतदार मतदान कक्षाकडे जातानाचे चित्रण

5. मतदान प्रतिनिधींची उपस्थिती

144

6. मतदान संपतेवेळी रांगेतील उमेदवारांना चिठ्ठयांचे वाटप

7. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम सीलींग व मतदान प्रतिनिधींना नमूना-17C देण्याची प्रक्रिया

8. वेब कॅमेरा / लॅपटाप मतदानाच्या आदल्या दिवशी लावण्यात यावा. त्याचे ड्राय रन घेण्यात यावे.

9. संबंधित मतदान केंद्राचे BLO व Sector Officer यांनी वेब कास्टिंगची व्यवस्था केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र आदल्या दिवशीच RO ना द्यावेत.

10. संबंधित मतदान केंद्राच्या आत व बाहेर ‘YOU ARE UNDER WEB CAMERA / CCTV SURVEILLANCE’ (आपण वेब कॅमेरा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहात) असे फलक लावावेत.

11. वेब कास्टिंग सलग व अखंडपणे करावयाचे आहे. ते बंद होणार नाही, याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी दक्षता घ्यायची आहे.