मतदानावेळी हे लक्षात ठेवा/हे विसरू नका/काही सर्वसाधारण चुका voting time
अभिरुप मतदानानंतर Close-Result-Clear क्रिया केल्या नाहीत. VVPAT मधून मॉक पोलच्या चिठ्ठया काढल्या नाहीत.
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर Close बटन दाबले नाही.
केवळ VVPAT बदलल्यानंतर मॉक पोल केला. जे अभिप्रेत नाही.
नमुना 17C जमा केला नाही किंवा अपूर्ण व चुकीचा जमा केला.
झालेल्या मतदानाचा आकडा योग्य प्रकारे दिला नाही. (एकूण मतदान केलेल्या मतदारांच्या संख्येऐवजी मतदान केंद्रावरील एकूण मतदारांची संख्या लिहिली. पुरुष व महिला मतदारांची आकडेवारी दिली नाही.)
CU/BU व VVPAT विनाकारण बदलले. (जोडणी व्यवस्थित नाही.)
CU/BU व VVPAT यांच्या वहनपेटीवर Address Tag लावला नाही व मतदानाचे शेवटी EVM मोहोरबंद केले नाही.
हे लक्षात ठेवा
• CU वरील Busy लॅम्प हा बंद झाल्यानंतर Close / Total बटन दाबता येईल. अन्यथा बटन दाबता येणार नाही.
त्यामुळे शेवटचा मतदार येऊन गेल्यानंतर चुकून बॅलट बटन दाबले गेले असल्यास अथवा शेवटच्या मतदाराने मतदानास नकार दिला असल्यास अशा वेळी CU चे पॉवर बटन बंद करावे.
• CU चे पॉवर बटन पुन्हा चालू करावे. आता Busy लॅम्प बंद झाल्यामुळे सर्व डिस्प्ले पूर्ण झाल्यावर क्लोज बटन दाबण्यास अडचण येणार नाही.
हे विसरु नका
मतदान प्रक्रिया सुरु असताना तुम्हास दिलेल्या मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये
वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी करा.
तुम्हास पुरविण्यात आलेले फॉर्म्स / नमुने यात आवश्यक त्या नोंदी वेळीच करा.
निवडणूक कामाशी संबंधीत असलेल्या विविध सांविधानिक आवश्यकतांची पूर्तता केली आहे याबाबत तपासणी ज्ञापनानुसार खात्री करुन घ्या.
मतदान सुरु होण्यापूर्वी व मतदान संपल्यानंतर प्रतिज्ञापत्र करण्यास विसरु नका.
हे विसरु नका
मतदान चालू असताना मतदान केंद्रास भेट देणा-या सर्व विशेष व्यक्तींची (निवडणूक निरीक्षक, सेक्टर ऑफिसर, नोडल ऑफिसर इ.) नोंद व्हिजीट शीटमध्ये करा.
तसेच कोणताही मतदार मोबाईल फोन घेऊन मतदान कक्षात प्रवेश करणार
नाही. तसेच मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईल बंद
ठेवतील याची दक्षता घ्या.
ज्या मतदारांची नांवे ASD (Absentee, Shifted, Dead Voter) यादीमध्ये आहेत अशा मतदारांची ओळख पटविण्याबाबत विशेष काळजी घ्या
हे विसरु नका
मतदान केंद्र संवेदनशील असल्यास मतदार ज्या क्रमाने मतदानासाठी येतील त्याच क्रमाने त्याचे छायाचित्र घेणेबाबत व्हिडीओग्राफरला सांगा.
कोणत्याही कारणसाठी तुम्हाला मतदान कक्षात जावे लागल्यास सोबत मतदान प्रतिनिधीला घेण्यास विसरु नका.