मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व संविधानिक व असंविधानिक लिफाफे व त्यांचे रंग voting envelope
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व संविधानिक व असंविधानिक लिफाफे खालील प्रमाणे तयार करावेत –
पाकीट नंबर 1:- रंग पांढरा
यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे आवरण (EVM Paper Covers) असे लिहावे EVM ठेवलेल्या Strong Room मध्ये ठेवायची कागदपत्रे
1. मतदारांनी नोंदविलेल्या मतांचा हिशोब ‘नमुना 17C’ असलेले पाकीट
2. मतदान केंद्राध्यक्षांचा अहवाल 1 (अभिरुप मतदान प्रमाणपत्र), 2, 3 असलेले
पाकीट
3. मॉक पोलमधील VVPAT Paper Slip ठेवलेल्या काळ्या रंगाचा लिफाफा.
वरील सर्व लिफाफे मोठ्या मुख्य लिफाफ्यामध्ये सीलबंद न करता ठेवावेत.
पाकीट नंबर 2:- रंग पांढरा- यावर छाननी पाकीट (SCRUTINY COVER) असे लिहावे.
1. मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी ठेवलेला सीलबंद न केलेला लिफाफा
2. मतदारांची नोंदवही ‘नमुना 17A’ असलेला सीलबंद लिफाफा
3. अंध व अपंग मतदारांचे ‘नमुना 17A’ मधील यादी व अशा मतदारांच्या सोबत्यांची प्रतिज्ञापत्रे ठेवलेले सीलबंद न केलेले लिफाफे.
4. सीलबंद न केलेले भेटपुस्तक (Visit Sheet)
वरील सर्व लिफाफे सीलबंद न केलेल्या पांढ-या रंगाच्या मोठ्या मुख्य लिफाफ्यामध्ये ठेवावेत.
पाकिट नंबर – 3:- रंग पांढरा संविधानिक लिफाफे
1. मतदार यादीच्या चिन्हांकित प्रती व वर्गीकृत सेवा मतदाराची (CSV) यादी असलेले सीलबंद केलेले पाकीट
2. मतदार सूचना चिठ्ठी (Voters Information slip) असलेले सीलबंद केलेले पाकीट 3. वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व ‘नमुना 17B’ मधील मतदार यादीचे सीलबंद केलेले पाकीट
4. न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिकांचे सील केलेले पाकीट
5. ‘नमुना 14’ मधील आक्षेपित मतांची यादी असलेले सील पाकीट
पाकीट नंबर 4 :- रंग पिवळा असंविधानिक लिफाफे
1. मतदार यादीच्या इतर प्रतींचे पाकीटे (चिन्हांकित प्रती व्यतिरिक्त)
2. ‘नमुना 10’ मधील मतदार प्रतिनिधींचे नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीचा हिशोब असणारे पाकिट
3. ‘नमुना 12B’ मधील EDC (इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट) पाकीट
4. मतदार केंद्राध्यक्षाची घोषणापत्रे असलेले पाकीट
5. आक्षेपित मतासंदर्भातील पावती पुस्तके आणि असल्यास रोख रक्कम असलेले पाकीट
6. न वापरलेले / खराब झालेल्या कागदी मोहरा आणि न वापरलेले / खराब झालेल्या Special Tag ठेवलेले पाकीट
7. न वापरलेल्या मतदार चिठ्ठया असलेले पाकीट
8. मतदाराकडून त्यांच्या वयासंबंधी घेतलेली प्रतिज्ञापत्रे व ज्यांनी असे प्रतिज्ञापन करण्यास नकार दिला आहे, अशा मतदारांची यादी असलेले पाकीट
9. मतदाराने टेस्ट व्होट (चाचणी मतदानाबाबत) नियम 49MA नुसार करुन दिलेले घोषणापत्र.
10. ASD यादीत नाव असलेल्या मतदारांनी करुन दिलेले घोषणापत्र.
11. पोलीस स्टेशन अधिका-यास द्यावयाचे तक्रारीबाबतचे पत्र.
हे लक्षात ठेवा-
वरीलप्रमाणे असांविधानिक ११ पाकीटे व संबंधित नमुने यांचा रंग पिवळा आहे.
निवडणूक विषयक कागदपत्रे मोहोरबंद करणे
पाकिट नंबर – 5:- रंग खाकी
वापरलेल्या व उर्वरीत पक्क्या शाईचा संच (शाई गळू नये किंवा तिचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी प्रत्येक कुपिकेवर वितळविलेल्या मेणबत्तीने किंवा लाखेने व्यवस्थीतपणे बूच लावून)
वापरलेले शाईचे पॅड (Brown रंगाचे)
मतदान केंद्राध्यक्षास देण्यात आलेली निर्देश पुस्तिका, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन, व्हीव्हीपॅट माहिती पुस्तिका इ.
हे लक्षात ठेवा-
वरील पाकीटांचा रंग खाकी आहे.
निवडणूक विषयक कागदपत्रे मोहोरबंद करणे
पाकिट नंबर – 6:- रंग निळा
धातूची मोहोर
प्रदत्त मतदानासाठी देण्यात आलेला बाण फुलीचा शिक्का पक्क्या शाईची बाटली ठेवण्यासाठी देण्यात आलेला कप अन्य मतदान साहित्य (सील, टॅग्स, शिक्के, पत्त्याच्या खूण चिठ्ठया, इत्यादी) ठेवण्यासाठी निळे पाकिट आहे.
या व्यतिरिक्त आपल्या जवळील इतर सर्व निवडणूक साहित्य सहाव्या पाकीटात ठेवावे.
हे विसरु नका
• वर सांगितल्याप्रमाणे BU, CU, संविधानिक व असंविधानिक पाकीटे व इतर महत्वाचे साहित्य, साहित्य संकलन केंद्रावर निवडणूक अधिका-याने सूचित केल्याप्रमाणे जमा करा.
* निवडणूक निर्णय अधिका-याने विहीत केलेल्या नमुन्यात मतदारांची ओळख पटविण्याच्या तपशीलाबाबतची माहिती तयार करा.
* यानंतर सहा. निवडणूक निर्णय अधिका-यांच्या परवानगीनेच व कार्यमुक्त झालेबाबतचे पत्र मिळाल्यानंतरच घरी जा.