मतदान समाप्त करण्याच्या वेळीची कार्यपद्धती voting closing 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान समाप्त करण्याच्या वेळीची कार्यपद्धती voting closing 

मतदान समाप्त करणे

जरी काही कारणास्तव मतदानास प्रारंभ करण्यास नेमून दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा मतदान सुरु झाले असले तरी मतदान निश्चित केलेल्या वेळीच समाप्त करण्यात यावे.

तथापि, मतदान अ.क्र. नमूद समाप्तीच्या निश्चित वेळी मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना मत देण्यासाठी त्यावेळेहून अधिक वेळेकरीता मतदान पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.

त्याकरीता मतदान केंद्राध्यक्षांनी रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीपासून सुरु करुन रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांना आधीच क्रमांक टाकलेल्या व केंद्राध्यक्षाची सही असलेल्या चिठ्ठयांचे वाटप करावे.

अशाप्रकारे चिठ्ठी दिलेल्या शेवटच्या मतदाराने मत नोंदविल्यानंतर मतदान समाप्तीसाठी मतदान यंत्र बंद करावे. त्याकरिता CU वरील Close बटण दाबावे.

Close बटण दाबल्यानंतर CU च्या Display पॅनलवर एकूण मतांची संख्या प्रदर्शित होईल, त्याची नोंद ‘नमुना 17C’ च्या भाग-१ मध्ये तात्काळ नोंदवावी.

मतदान समाप्त करणे

एकदा Close बटण दाबल्यानंतर कोणत्याही मतदारास मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्षाने मतदान समाप्तीच्या वेळी उपस्थित असलेला कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन मगच Close बटण दाबावे.

त्यानंतर मतदारांच्या नोंदवहीत (नमुना-१७अ) मध्ये शेवटच्या नोंदीखाली लाल रेघ ओढावी व त्याखाली “नमुना 17A मधील शेवटचा अ.क्र आहे,” अशी नोंद करुन केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करावी व उपस्थित मतदान प्रतिनिधींच्या देखील सह्या त्याठिकाणी घ्याव्यात. मतदान केंद्राध्यक्षाच्या अहवालातील ‘भाग-३’ तयार करावा.

मतदान समाप्तीच्या वेळी CU बंद करताना त्यावरील Poll End Date and Time हे केंद्राध्यक्षाच्या डायरीमध्ये नमूद करावे.

मतदान बंद करणे व EVM सील करणे.

उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर सर्वात शेवटी CU स्विच ऑफ करा. त्यानंतरच VVPAT चा नॉब आडवा करा. CU, BU व VVPAT स्वतंत्र करा. केवळ VVPAT मधील बॅटरी (Power Pack) काढावी व सर्व मशिन त्यांच्या कॅरींग केसमध्ये ठेवा. प्रत्येक पेटीच्या दोन्ही बाजूस Address Tag लावून सील करा.

नोंदविलेल्या मतांचा हिशोब तयार करणे

‘नियम 49S’ नुसार मतदान समाप्त झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी EVM मध्ये नोंदविलेल्या मतांचा हिशोब करावयाचा आहे. हा हिशोब ‘नमुना 17 C’ या नमुन्यात तयार करावा.

एक प्रत ही नोंदविलेल्या मतांचा हिशोब (Account of Votes Recorded) असे लिहिलेल्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करावे.

दुसरी प्रत अशाच प्रकारे लिफाफ्यामध्ये, परंतू सीलबंद न करता ठेवावी व साहित्य स्विकृतीच्या ठिकाणी जमा करावी. अशा प्रकारे तयार केलेल्या नमुना 17C’ ची प्रमाणित सत्यप्रत प्रत्येक मतदान प्रतिनिधीस, त्याने मागणी केलेली असेल अथवा नसेल तरीही द्यावयाची आहे.

मतदानाच्या दुस-या दिवशी स्वतः निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या उपस्थितीत ‘फॉर्म-१७ सी’ची तपासणी करणार असल्यामुळे सदर फॉर्म मधील नोंदविलेल्या मतांचा हिशोब बिनचूक असणे गरजेचे आहे. म्हणूनच सदर फॉर्म अत्यंत काळजीपूर्वक दोन प्रतीत भरावा.

मतदान प्रतिनिधींना नोंदविलेल्या मत्तांच्या हिशोबाच्या प्रती सादर करण्याशी संबंधित नियम 498 अन्वये भाग-3 (जोडपत्र-6) मध्ये मतदान समाप्त करताना घोषणापत्र तयार करण्यास विसरु नका.

मतदान बंद करणे व वाहतूक

VVPAT चा मागचा पेपर लॉक नॉव आडवा करा व VVPAT त्याच्या कॅरींग केसमध्ये ठेवा. वाहतुकी दरम्यान VVPAT चा नॉव ट्रान्सपोर्ट मोडमध्ये आडवा असणे गरजेचे आहे.

लिफाफे व त्यांचे रंग आणि त्यात ठेवायचे साहित्य

पांढरा–ईव्हीएम सोबत ठेवावर

पांढरा —छाननी संदर्भातील का..

पांढरा–सांविधानिक पाकिटे

पिवळा–असांविधानिक पाकिटे

खाकी–हस्तपुस्तिका, सूचनापत्र, पक्की शाई, स्टॅम्प पेंड

निळा –इतर साहित्य