श्रद्धांजली अन् लग्नात आशीर्वाद भाषण बंदी औरंगपूर गावाने घेतला निर्णय Village decision
अकोले : तालुक्यातील औरंगपूर या लोकमत न्यूज नेटवर्क छोट्या गावाने दशक्रिया विधितील श्रद्धांजलीची भाषणे व विवाह सोहळ्यातील आशीर्वाद पर दोन शब्द यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रद्धांजली आणि आशीर्वाद भाषणाने लोक कंटाळून जातात. ज्याच्याबद्दल माहिती नसते ते बराच वेळ भाषण करतात. काकस्पर्श होतो तरी बराचवेळ पै पाहुण्यांना ताटकळत बसावे लागते. लग्नात मुहूर्त टळून जातो तरी आशीर्वादाची भाषणे संपता संपत नाही. नव्याने रूजू होऊ घातलेल्या या
दहाव्यात श्रद्धांजली अन् लग्नात आशीर्वाद भाषण प्रथेला औरंगपूर या छोट्या गावातील लोकांनी विरोध करत गावात दशक्रिया विधितील श्रद्धांजली व लग्नातील आशीर्वाद यावर बंदी घातली आहे.
एका दशक्रिया विधीत जवळपास आडीच हजार लोकांसमोर ही घोषणा करण्यात आली. दुःखात असून देखील पै पाहुण्यांनी व उपस्थित गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयाची तालुक्यात चर्चा असून परिसरातील गावांनी देखील असाच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.