इ.1 ली ते 12 वी विद्यार्थी लाभाच्या योजना क्यूआर कोड स्कॅन करुन पहा vidhyarthi labhachya yojana
उपरोक्त विषयाकित संदर्भ क्र.०१ अन्वये, मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या कार्यालयास दिलेल्या भेटीवेळी सर्व शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये (इयत्ता १ ली ते १२ वी) त्या-त्या इयत्तांशी संबंधित विद्यार्थी लाभाच्या योजनांची माहिती QR Code व्दारे दर्शविणेबाबत सूचित केलेले होते. या कार्यालयाचे पत्र संदर्भ क्र.०२ नुसार इयत्ता निहाय विद्यार्थी लाभाच्या योजनांची माहिती QR Code व्दारे शालेय पाठयपुस्तकांमध्ये छपाई करणेबाबत आपणास विनंती करण्यात आलेली होती. आपण संदर्भ क्र.०३ अन्वये, सद्यस्थितीत पाठ्यपुस्तकांमध्ये QR Code देण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थी लाभाच्या योजनांची QR Code मधील माहिती मंडळाच्या सव्र्व्हरवर पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्याचे तसेच मंडळाच्या किशोर मासिकामध्ये छपाई करण्याचे ठरविलेले असल्याबाबत कळविलेले आहे.
त्याअनुषंगाने विद्यार्थी लाभाच्या योजनांची माहिती QR Code सह पीडीएफ स्वरूपात (सॉफ्ट कॉफी) या पत्रासह आपणास पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात येत आहे.
सहपत्र- विद्यार्थी लाभाच्या योजनांची माहिती QR Code सह पीडीएफ स्वरूपात (सॉफ्ट कॉफी)
Pall