विद्यांजली पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत रजिस्ट्रेशन लिंक येथे पहा vidhyanjali portal ragistration link 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यांजली पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत रजिस्ट्रेशन लिंक येथे पहा vidhyanjali portal ragistration link 

विद्यांजली २.० कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत आणि तालुका समन्वयक नियुक्त करणे बाबत. संदर्भ: मा. सहसंचालक, रा.शै.सं.व प्र.प. महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र, जा.क्र.रा.शै.सं.व.प्र.प./सा.शा. वि./विद्यांजली 2.0/974 दि.23/02/2022

उपरोक्त विषयानुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० यामध्ये

त्यातील लक्ष्य साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे. याकरिता विद्यांजली २.० वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली २.० A Volunteer Management Programme हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची अत्यावश्यक भूमिका आहे. विद्यांजली २.० हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रिकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली २.० विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला / मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक/शासकीय/निमशासकीय अधिकारी, कर्मचारी/सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी, साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा/कृती, मालमत्ता / साहित्य / उपकरणे, प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.

तदनुषंगाने आपल्या अधिनस्थ असणाऱ्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील क्षेत्रीय अधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक व कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्था यांना

विद्यांजली पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत रजिस्ट्रेशन लिंक येथे पहा

https://vidvanjali.education.gov.in

या विद्यांजली कार्यक्रमाच्या पोर्टलवर जाऊन शाळांची नोंदणी करणेबाबत अवगत करण्यात यावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी पत्रासोबत जोडलेल्या मसुद्याचे सखोल अवलोकन करण्यात यावे. विद्यांजली कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी एक तालुका समन्वयक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. सदर पोर्टल वर आपल्या तालुक्यातील सर्व शाळांची नोंदणी करावी तसेच याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा सोबत,

1. तालुका समन्वयक यादी

2. विद्यांजली मसुदा

Leave a Comment