विद्यांजली २.० पोर्टलवर CSR मॉड्युल सक्रिय करण्यासाठी जिल्हानिहाय थीम निवड आणि एप्रिल ते जून २०२५ साठीचा प्रस्ताव तयार करणेबाबत vidhyanjali portal csr module 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यांजली २.० पोर्टलवर CSR मॉड्युल सक्रिय करण्यासाठी जिल्हानिहाय थीम निवड आणि एप्रिल ते जून २०२५ साठीचा प्रस्ताव तयार करणेबाबत vidhyanjali portal csr module 

संदर्भ

: १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र F.N. 4-2/2022/KT

दि.०८/०१/२०२५.

२. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचा दूरध्वनी संदेश दि.०३/०४/२०२५

३. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे बैठकीतील निर्देश दि.०७/०२/२०२५

उपरोक्त विषयानुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० यामध्ये त्यातील लक्ष्य साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केलेली आहे. याकरिता विद्यांजली २.० वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली २.० A Volunteer Management Programme हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.

शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची भूमिका आवश्यक आहे. विद्यांजली २.० हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचे एकत्रिकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली २.० विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला/मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक / शासकीय / निमशासकीय

अधिकारी, कर्मचारी/सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी, साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा/कृती, मालमत्ता/साहित्य/उपकरणे, प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.

तदनुषंगाने शालेय शिक्षण संस्थेला बळकट करण्यासाठी कंपन्या/नागरी संस्था/सरकारी संस्थांकडून संसाधने एकत्रित करण्यासाठी ऑक्टोबर, २०२४ मध्ये पोर्टलवर एक विशेष CSR मॉड्यूल https://vidyanjali.education.gov.in/csr/ विकसित करून जोडण्यात आले आहे. यामध्ये ११ व्यापक थीम अंतर्गत शाळांद्वारे निर्माण केलेले जिल्हानिहाय सीएसआर प्रकल्प जसे की डिजिटल पायाभूत सुविधा, सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि खेळांसाठी उपकरणे, मूलभूत नागरी पायाभूत सुविधा वैगेरे राज्य नोडल अधिकाऱ्यांद्वारे पोर्टलवर अपलोड केले जातात. CSR प्रकल्प प्रत्येक तिमाहीत निधी मागणीसाठी जिल्हानिहाय तयार केले जातात. एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीसाठी CSR मॉड्यूल अंतर्गत थीम निवड आणि प्रकल्प तयारीसाठी विंडो आता प्लॅटफॉर्मवर आहे. खालील कालावधीमध्ये संदर्भ क्र.२ नुसार कार्यवाही अपेक्षित आहे.

जिल्हा नोडल ऑफिसर द्वारे थीम निवड: ०२ ते ०९ एप्रिल, २०२५

शाळांद्वारे प्रकल्प आवश्यकता: १० ते २० एप्रिल, २०२५

जिल्हा नोडल ऑफिसर द्वारे थीमनिहाय प्रकल्प एकत्रीकरणः २१ ते ३० एप्रिल, २०२५

राज्य नोडल ऑफिसर द्वारे जिल्हानिहाय प्रकल्पांना मंजुरी आणि अपलोड करणे: ०१ ते १० मे, २०२५.

CSR सहभागासाठी खुले प्रकल्पः ११ मे २०२५ नंतर

उपरोक्त संदर्भ क्र. ३ मा.आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे बैठकीतील निर्देशानुसार जिल्हा नोडल अधिकारी यांनी डिजिटल पायाभूत सुविधा व सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि खेळांसाठी उपकरणे या दोन थीमचीच निवड करून त्यावर आधारित प्रस्ताव तयार करण्यासाठी शाळांशी सक्रियपणे समन्वय साधावा. तसेच सदर पत्र प्राप्त होताच जिल्ह्यातील पर्यवेक्षीय अधिकारी यांना विद्यांजली पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. विद्यांजली पोर्टलच्या बाबत काही तांत्रिक अडचणी जाणवल्यास विद्यांजली कार्यक्रमाचे राज्य नोडल अधिकारी श्री. अरुण जाधव यांच्याशी ९४२३५३७९२७ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. संबधितानी सदर निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत आपले स्तरावरून आदेशित करण्यात यावे.

Join Now