आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मतदान केंद्रावरील साहित्याच्या खरेदीस मान्यतेबाबत vidhansabha election shahitya
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या साहित्याच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
प्रस्तावना :-
(२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णय क्र. भांखस-२०१४/प्र.क्र.८२/ भाग-॥/उद्योग-४, दिनांक १ डिसेंबर, २०१६
(३) शासन ज्ञापन क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२४/२४/निवडणूक-१२, दिनांक २० सप्टेंबर, २०२४
उपरोक्त संदर्भाधीन वाचा क्र. (३) येथील शासन ज्ञापनान्वये, आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यातील १,०२,००० मतदान केंद्रांकरिता आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तथापि, आता मतदान केंद्राच्या संख्येत १० % अंदाजित वाढ विचारात घेऊन मतदान केंद्राची संख्या १,११,५०० याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या सुधारित निश्चित प्रमाणानुसार निवडणूकीशी संबंधित आवश्यक असणाऱ्या सांहित्यांचा पुरवठा सदर मतदान केंद्रावर होणे आवश्यक आहे. त्यानुसार सुधारित वाढीव मतदान केंद्रांप्रमाणे आवश्यक असणाऱ्या साहित्याची यादी तसेच साहित्य खरेदीसंबंधिचे दरपत्रक आणि साहित्याच्या वितरणासंबंधित माहिती कळविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन ज्ञापन:
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता १,११,५०० इतक्या मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक साहित्याच्या खरेदी करण्याच्या रु.२,५८,८०,१००/- (रुपये दोन कोटी अठ्ठावन्न लक्ष ऐंशी हजार शंभर फक्त) इतक्या रक्कमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.