मतदान केंद्रावर पोहोचल्यावर काय करावे? Vidhabsaba election votting
ज्या मतदान केंद्रावर नेमणूक आहे ते मतदान केंद्र आदेशातील ठिकाणी, इमारतीत व खोलीत असल्याची खात्री करा.
मतदान केंद्रासाठी पुरेसे फर्निचर, दिवाबत्ती आहे का याची खात्री करा. नसल्यास स्थानिक पातळीवर उपलब्ध करुन घ्या.
मतदान केंद्रामध्ये जर राजकीय नेते, पक्षचिन्हे वगैरेचे फोटो, वर्गाच्या भिंतीवर। जमिनीवर कोणत्याही पक्ष-चिन्हाशी साधर्म्य असलेली चित्रे लावली/रंगवली असतील तर ती झाका अथवा फोटो उलटे करा.
मतदान केंद्राच्या बाहेरच्या बाजूस मतदान क्षेत्र आणि त्या मतदान केंद्रात मतदान करणा-या मतदारसंबंधीचा तपशील दर्शविणारी नोटीस लावा.
26
मतदान केंद्रावर पोहोचल्यावर
निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या ‘नमुना 7A’ मधील यादीची एक प्रत व डमी मतपत्रिका ठळक ठिकाणी लावा.
सदर मतदान केंद्रावर दिशादर्शक चिन्हे लाववेत.
अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका दिलेली असेल. या मतपत्रिकेच्या प्रत्येक पानावर उमेदवारांचे अनुक्रमांक एक पासूनच असतील, याची नोंद घ्या.
प्रदत्त मतपत्रिकेच्या मागील बाजूस वरील उजव्या कोप-यात विभेदक चिन्हाचे शिक्के मारुन ठेवा. तसेच त्यावर केंद्राध्यक्षाने सह्या करुन ठेवाव्यात.
मतदान केंद्रावर नेमलेल्या मतदान प्रतिनिधींना मतदानाच्या दिवशी मतदान सुरु होण्यापूर्वी किमान 90 मिनिटे अगोदर हजर राहण्यासाठी सूचना द्या.
27
28
मतदान केंद्रावर पोहोचल्यावर
मतदान केंद्रावर नेमलेले सर्व मतदान अधिकारी हजर आहेत याची खात्री करा, नसल्यास सेक्टर / झोनल ऑफिसर यांचे निदर्शनास आणा.
मतदान केंद्रासाठी नेमलेल्या सर्व अधिका-यांना त्यांची नेमून दिलेली कर्तव्ये समजावून द्या.
मतदान केंद्राची १०० व २०० मीटरची कक्षा आखून घ्या.
मतदान केंद्र तयार करुन मतदानासाठी सज्ज ठेवा.
व्हीव्हीपॅटवर थेट उजेड पडणार नाही याची दक्षता घ्या. त्याला थेट खिडकीत ठेवू नका.
मतदान केंद्राची विहीत पध्दतीनुसार रचना करुन घ्या.
CU/BU/VVPAT यांच्या केबल मतदाराच्या व मतदान अधिका-यांच्या पायात येणार नाहीत अशी रचना करा.
मतदान कक्षाच्या मागे / जवळ खिडकी असल्यास ती बंद करा व मतदानाची गोपनियता पाळली जाईल याची खात्री करा. खिडकी झाकण्यासाठी वर्तमानपत्र वापरल्यास त्यावर राजकीय पक्षांच्या जाहिराती/ चिन्हे नाहीत याची खात्री करा.
मतदान केंद्रावरील BLO (Booth Level Officer) यांची ओळख करुन घ्या.