शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा जिल्हा व तालुकास्तर बक्षीस वितरणाबाबत video making competition prize
संदर्भः मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा क्र ०१०९० दि. २६/०२/२०२५
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, राज्यस्तरावर २०२३ मध्ये शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे मूल्यांकन पूर्ण झाले असून जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीस वितरणाबाबत कळविले आहे. त्यानुसार दि. २७ मार्च २०२१५ रोजी सकाळी ११.०० वा. बक्षिस वितरणाचा कार्यक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जालना येथे होणार आहे. सोबतच्या यादीतील जिल्हा व तालुकास्तर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ट्राफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी सदरील शिक्षकांना दि. २७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून
आदेशित करावे.