राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी,निवडश्रेणी प्रस्ताव बाबत varishtha vetan shreni
विषय :- राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव जिल्हयातील शिक्षणाधिकारी यांनी बोलवून घेऊन डिसेंबर, २०२३ पूर्वी कॅम्पमध्ये निकाली काढण्यासाठी आदेश होणेबाबत
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव बाबत परिपत्रक येथे पहा
संदर्भ :
– १) श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांचे दिनांक ३०.१०.२०२३ रोजीचे पत्र २) शासन समक्रमांक दिनांक ०५.०१.२०२४
उपरोक्त विषयावरील संदर्भ क्र. २ चे कृपया अवलोकन करावे.
०२. राज्यातील ब-याच संस्था/शाळा कर्मचा-यांची, पात्र असतानाही वरिष्ठ / निवडश्रेणी / नियमित वेतनश्रेणी याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली नाहीत. सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत उक्त पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
०३. सबब, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून कॅम्प आयोजित करुन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.