ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणेबाबत varishth vetan shreni
संदर्भ
:- १) शासन निर्णय क्र. चवेआ-१०८९/१११/माशि-२, दि.२.०९.१९८९.
२) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र. ४३/प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१.
३) शासन पत्र क्रमांक: शिप्रधो २०२१/ प्र.क्र. ६७/प्रशिक्षण, दि.०८.०५.२०२३.
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ९४,५४२ प्रशिक्षणार्थी यांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे –
१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे,२०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक २९ मे,२०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.
५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.
६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
गट क्र.१- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)
७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय.डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन
पोर्टलवर “शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी” हा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.
९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
१०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय.डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येतील.
११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.
१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय. डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल आय.डी. / यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल.
१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास “माहितीत बदल करा” या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
१४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील- इंटरनेट बँकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड/UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.
१७. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.
१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.
१९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय. डीवरून trainingsupport@maa.ac.in या ई- मेल आयडीवर संपर्क करावा.
२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.
२२. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.
२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी.
२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.
उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शानास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४
२. श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९४
rukhmabaikunte1676@gmail.com
varishth vetan shreni ”
surekhabhujbal2@gmail.com
प्रशिक्षण संकेतस्थळ मिळावे
कृपया प्रशिक्षण नोंदणी दिनांक कळवावी.
Online nivad shreni prashikshan nav nondani
माझी इयत्ता 1 ते 4 ला एकूण 29 वर्ष प्राथमिक शिक्षिका पदावर सेवा झालेली आहे. मला निवड श्रेणी ट्रेनिंग करावयाचे आहे.
कृपया प्रशिक्षण नोंदणी दिनांक कळावा
I have completed 24 years on high school as a assistant teacher. Urdu medium. So I wanted 24 year’s training
I have completed 12,years as a teacher at Shankar Naik Jr. College, Gadadgavhan
Last year I have completed 24 years please convey me the date of registration of nivad shrini.
I HAVE COMPLETED 24 YEARS ON PRIMARY SCHOOL, AS A ASSISTANT TEACHER IN URDU MEDIUM , SO I WANTED 24 YEARS TRAINING (NIVVAD SHRENI).
प्रशिक्षण नाव नोंदणी दिनांक 29 मे 2023 ते 12 जून 2023 अशी दिलेली आहे वर्ष चुकलेले आहे असे मला वाटते
मला २४ वर्षे पूर्ण झाली आहे.
निवड श्रेणी प्रशिक्षण 2024
Mi class 1st to 8th class teaching karte
I have completed 24 on primary school as a assistant Teacher in Marathi medium.So I wanted 24 year’s training (nivad shreni)
Dattatray Pandurang Jasud
Chh. Sambhji Raje Sainik school jamage
Tal- khed
Dist- Ratnagiri
415709
माझे 24 वर्षे पूर्ण झाले आहेत
Mob no -9423824671
Dattatray Pandurang Jasud
Chh. Sambhji Raje Sainik School Jamage
Tal- Khed
Dist -Ratnagiri
Pin -415709
प्रशिक्षण –24 वर्ष
माध्यमिक-9 वी 10 वी
मी श्री. नरेश जयराम जाबरे, बी.एस्सी.बी.एड्,एम. ए.इकॉनॉमिक्स.,माझी शिक्षक सेवा 30 वर्षे पूर्ण झाली आहेत मला निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे
मी श्री. नरेश जयराम जाबरे, बी.एस्सी.बी.एड्,एम. ए.इकॉनॉमिक्स.,माझी शिक्षक सेवा 30 वर्षे पूर्ण झाली आहेत मला निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आ
मी 1ते 8 वी वर्गाला शिकवते आणि मला 25 वर्ष पूर्ण झालं आहे नोकरीला
मी 1ते 8 वी वर्गाला शिकवते आणि मला 25 वर्ष पूर्ण झालं आहे नोकरीला आणि मला निवड श्रेणी प्रशिक्षण करायचे आहे.
वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण ..
24 year complete
निवड श्रेणी प्रशिक्षण 2024 रजिस्टेशन होत नाही कृपया नवीन लिंक पाठवावे.
निवड श्रेणी प्रशिक्षण 2024
Sanjivani more8003@gmail.com
माझी शिक्षक सेवा 24 वर्ष पूर्ण झालेली आहे. मला निवडश्रेणी प्रशिक्षण करायचे आहे
Pukharaj nagar new bhokardan dist jalna Maharashtra
माझ्या सेवेचे बारा वर्षे पूर्ण झाले आहेत
श्री व्यंकटेश उच्च माध्यमिक विद्यालय लातूर
या अभ्यास क्रम मध्ये Tech ical या विषय स्वंतत्र पणे असवा . ज्याने करूण विद्यार्थी स्वंवल बी बनेल
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले असते तर वेळ पैसा श्रम यामध्ये बचत झाली असती.
निवड श्रेणी 20 24 चे रजिस्ट्रेशन होत नाही कृपया नवीन लिंक पाठवा
निवड श्रेणी 20 24 चे रजिस्ट्रेशन होत नाही कृपया नवीन लिंक पाठवा
, मला 24 वर्ष सन 2016–2017 ला पूर्ण झाली.
Send link new
नवीन लिंक पाठवा
कृपया वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी लिंक पाठवा
Please send link of Registration for Senior Grade
For the year 20243-24