उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मतदान साक्षरता जनजागृतीसाठी घ्यावयाच्या उपक्रमाबाबत ullas navbharat saksharta karyakram janajagruti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मतदान साक्षरता जनजागृतीसाठी घ्यावयाच्या उपक्रमाबाबत ullas navbharat saksharta karyakram janajagruti 

संदर्भ: 1) शासन निर्णय क्रमांक नभासाका-0322/प्र.क्र.39/ एस.डी., मंत्रालय, मुंबई-32 दि. 14 ऑक्टोबर, 2022

2) शासन निर्णय क्रमांक: नभासाका 0322/प्र.क्र.39/ एस.डी.2, मंत्रालय, मुंबई 32 दि. 25 जानेवारी, 2023.

उपरोक्त संदर्भ क्र. 1 नुसार, सन 2011 च्या जनगणनेनुसार, देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरांची संख्या 25.76 कोटी आहे. सन 2009-10 ते 2017-18 दरम्यान राबविण्यात आलेल्या साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत 7.64 कोटी साक्षर झालेल्या व्यक्तीच्या प्रगती अहवालाचा विचार करता, देशात अजूनही 18.62 कोटी लोक निरक्षर आहेत. त्यानुषंगाने राज्यात उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. राज्यासाठी 2023-24 साठी 6,20,000 व सन 2024-25 साठी 6,20,000 असे एकूण 12,40,000 इतके असाक्षर नोंदणी उद्दिष्ट निश्चित केलेले आहे.

त्यापैकी दिनांक 17 मार्च 2024 रोजी झालेल्या FLNAT परीक्षेत 4,25,906 इतके असाक्षर आता नवसाक्षर झाले आहेत. संदर्भ क. 2 नुसार, सन 2022 ते 2027 पर्यंत चालणाया उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय/ जिल्हास्तरीय / गटस्तरीय/ शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातील जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी यांनी नियामक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पहावे असे आदेशित करण्यात आलेले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेचा राज्याच्या आराखड्याप्रमाणे जिल्हास्तरावर नियोजन करणे, उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेच्या राज्यस्तरावरून निश्चित करून दिलेल्या असाक्षर उद्दिष्ट संख्यापूर्तीसाठी

जिल्हास्तरावर मोहीम राबविणे, उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन इझयादी बाबत धोरणात्मक निर्णय घेणे, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाने ठरवून दिलेले धोये व उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेणे, जिल्हास्तरीय कार्यकारी

हे ही वाचा

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2024-25 ऑफलाइन पद्धतीनेच होणार

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नाव नोंदणी बाबत

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करताना गैरमार्गाचा अवलंब करू नये

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रस्ताव

ऑनलाइन वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणीसाठी अधिकृत लींक 

समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेणे, जिल्हास्तरीय नियामक समितीने अधिकार प्रदान केलेल्या बाबींवर कार्यवाही करणे इत्यादी बाबींची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस देण्यात आलेली आहे.

उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांमध्ये केवळ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करणे एवढ्या पुरता हा कार्यक्रम मर्यादित नसून महत्वपूर्ण जीवन कौशल्ये, मुलभूत शिक्षण, व्यावसायिक कौशल्ये विकसित करणे व त्यांना निरंतर शिक्षण देणे या प्रमुख उद्दिष्टांचाही त्यामध्ये समावेश आहे. असाक्षर व स्वयंसेवक यांना अध्ययन अध्यापनासाठी उल्लास मार्गदर्शिका भाग 1 ते 4 स्वयंसेवक मार्गदर्शिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील भाग क्र. 2 मध्ये मतदान विषयी सचित्र माहिती देण्यात आली आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. लोकशाहीच्या सुदृढीकरण व बळकटीकरणासाठी सर्व प्रौढ नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे.

(कू.मा.प.)

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी 17 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या FLNAT परीक्षेत एकूण 4,25,906 इतके असाक्षर साक्षर झाले आहेत. त्या सर्व नवसाक्षरांना मतदान करण्यासाठी शाळा स्तरावरून आवाहन करण्यात यावे. तसेच पुढील काळात विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर खालील मतदान साक्षरता विषयक उपक्रमांचे आयोजन दिनांक 11/11/2024 ते 18/11/2024 या कालावधीत करावे,

A) मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मिती:

मतदान साक्षरता जनजागृतीसाठी व्हिडिओ निर्मिती करून सोशल मीडियावर (यु-ट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी) प्रसिद्धी देण्यात यावी. विडिओ निर्मिती गट।

1. शालेय विद्यार्थी गट- a) इयत्ता 5 वी ते 8 वी व b) 9 वी ते 12 वी.

2. नवसाक्षर (वय वर्षे 15 व त्यापुढील दि. 17 मार्च, 2024 च्या FLNAT परीक्षेत उत्तीर्ण झालेले) निकष: 1) व्हिडिओ 3 ते 5 मिनिटांचा असावा.

2) सुरुवातीस स्वतःचा थोडक्यात परिचय असावा. (नाव, शाळा व स्पर्धा गट) 3) व्हिडिओमध्ये मतदानाचे महत्त्व विषद करून मतदान साक्षरता केलेली असावी.

4) व्हिडिओमधून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी,

B) मतदान साक्षरता अनजागृतीसाठी पत्रलेखन: पत्रलेखन गट:

1. शालेय विद्यार्थी गट ) इयता 5 वी ते 8 वी व b) 9 वी ते 12 वी.

2. नवसाक्षर (वय वर्षे 15 व त्यापुढील दि. 17 मार्च, 2024 च्या FLNAT परीक्षेत उत्तीर्ण झालेले)

विषय: आई-बाबा, आजी-आजोबा काका-मावशी, मामा-मामी मतदान करायचं है।

निकण: 1) शब्द मर्यादा गट) इयत्ता 5 वी ते 8 वी 150 शब्द. b) 9 वी ते 12 वी 180 शब्द.

2) पत्रामध्ये मतदानाचे महत्व विषद केलेले असावे.

3 पत्रलेखनाचा मुख्य आशय मतदानाचे मतदान साक्षरता करणारा असावा…

4) पत्रलेखनामधून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वरील दोन्ही स्पर्धा व स्पर्धकांना सौशल मिडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात यावी, शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर दोन्ही स्पर्धा प्रकारांमध्ये प्रथम पाच क्रमांक काढून प्रमाणपतत्रे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या स्तरावरून वितरित करावीत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाच्या व्हिडिओची लिंक व पत्रे शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व SCERT, पुणे या कार्यालयास सादर करावीत.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download