राज्यातील आठ लाख प्रौढ परीक्षेला बसणार असे असणार पेपर चे स्वरूप नवभारत साक्षरता कार्यक्रम ullas navbharat literacy program
यवतमाळ वार्ताहर – दहावी-बारावीच्या परीक्षेतून नातवंडे मोकळी होताच आता घरातील निरक्षर आजी-आजोबांची परीक्षा होणार आहे. नव भारत साक्षरता कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या या प्रौढांची येत्या रविवारी (ता. 23-03-2025) प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्यातून तब्बल आठ लाख प्रौढ या परीक्षेला बसणार आहेत.
केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून असाक्षरांची नांदणी आणि त्यांचा अभ्यासवर्ग सुरू आहे. आता त्यांची परीक्षा घेऊन त्यांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी 17 मार्च रोजी झालेल्या या परीक्षेतून सुमारे पाच लाख प्रौढांनी ‘साक्षर होण्याचा’ आनंद मिळविला आहे.
आता आणखी आठ लाख आजी-आजोबांना ही संधी चालून आली आहे. राज्यात हा कार्यक्रम योजना शिक्षण संचालनालयामार्फत राबविला जात आहे. शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, असाक्षर प्रौढांनी ज्या शाळेतून नोंदणी केली, ती शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र राहणार आहे.
इतक्या गुणांचा असेल पेपर
दीडशे गुणांच्या या परीक्षेत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या घटकांवर प्रत्येकी 50 गुणांचे प्रश्न असतील. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात 33 टक्के म्हणजे किमान 17 गुण आजी-आजोबांना मिळवावे लागणार आहेत. तर परीक्षकांना पाच वाढीव गुण देण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे, सकाळी 10 ते
सायंकाळी 5 या वेळेत प्रौढांना आपल्या सोयीनुसार कधीही शाळेत जाऊन दीड तासात पेपर सोडवता येणार आहे. दिव्यांगांना 30 मिनिटे जादा मिळणार आहेत.
असे आहेत राज्यातील परीक्षार्थी
– मागील वर्षी नोंदणी करूनही परीक्षा न देणारे : 2,03,130
– मागील वर्षी ‘सुधारणा आवश्यक’ शेरा मिळालेले : 33,627
– यावर्षी उल्लास अॅपवर नोंदणी झालेले: 5,58,392
– राज्यातील एकूण परीक्षार्थी प्रौढ : 8,04,099
2024-25 या सत्रात नोंदणी झालेल्या असाक्षरांबरोबरच मागील वर्षी ज्यांना ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाला होता, त्यांनाही यंदा परीक्षेला बसायचे आहे. तसेच मागील वर्षी नोंदणी करूनही ज्यांनी परीक्षा दिली नाही, त्यांनाही यंदा परीक्षा बसायचे आहे.
– डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)
– राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक, नव भारत साक्षरता
कार्यक्रम
कोणत्या जिल्ह्यात किती प्रौढ देणार परीक्षा?
जिल्हा : परीक्षार्थी
विदर्भ –
अमरावती : 14758
नागपूर : 23325
अकोला : 13223
यवतमाळ : 17122
वर्धा : 9439
गडचिरोली : 31707
चंद्रपूर : 23515
वाशिम : 18972
भंडारा : 7030
बुलडाणा : 14211
गोंदिया : 7889
पश्चिम महाराष्ट्र –
पुणे : 41944
सांगली : 15895
सोलापूर : 35250
सातारा : 18050
कोल्हापूर : 24292
मराठवाडा –
परभणी : 20374
बिड : 21281
हिंगोली : 10428
लातूर : 19272
नांदेड : 28629
जालना : 21162
धाराशिव : 15237
छत्रपती संभाजीनगर : 26921
उत्तर महाराष्ट्र –
धुळे : 17532
अहमदनगर : 34624
नाशिक : 40007
नंदूरबार : 31503
जळगाव : 50849
कोकण –
सिंधुदुर्ग : 4496
रत्नागिरी : 12094
ठाणे : 33237
पालघर : 33691
रायगड : 15329
मुंबई उपनगर : 35684
मुंबई : 15127