सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी कमी करणेबाबत मार्गदर्शक सूचना udise plus online pranali dropbox decrease student
सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळांना देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना. (https://udiseplus.gov.in/)
महोदय,
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही शाळास्तरावरून सुरू आहे. विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करीत असताना शाळा सोडून गेलेले विद्यार्थी Dropbox मध्ये जातात, जेणेकरून ज्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे त्या शाळेला विद्यार्थी Import करणे सोयीचे होईल. यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०४ जुलै, २०२४ रोजीच्या अहवालानुसार ३१,९६,७८६ एवढे विद्यार्थी Dropbox मध्ये Import करण्यासाठी उपलब्ध आहेत.
Dropbox मधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळा सोडून जात असल्यास, विद्यार्थ्यांना Living Certificate/Transfer Certificate वर शाळेचा यु-डायस क्रमांक व Permanent Education Number (PEN) नोंदवावा, जेणे करून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांला शाळेत प्रवेश दिल्यानंतर यु-डायस प्लस प्रणालीमध्ये
Import करताना अडचण येणार नाही. तरी आपल्या स्तरावरून Dropbox शून्य करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
सोबत : Dropbox Report