यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना APAAR आयडी तयार करणेबाबत udise plus appar id creation 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना APAAR आयडी तयार करणेबाबत udise plus appar id creation 

यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना APAAR आयडी दि. ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत उपलब्ध करून देणेबाबत.

संदर्भ

: १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. F. No.१- २७/२०२३-DIGED-Part (१) दि. २१/१०/२०२४.

२) कार्यालयाचे जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/ २०२४-२५/३१५४ दि. २३/१०/२०२४ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये यु-डायस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्यााबबत केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली दि. ०६/११/२०२४ रोजी झालेल्या आढावा मिटिंगमध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना APAAR आयडी तयार करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहे.

राज्यातील जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व तालुका स्तरावरील डेटा एन्ट्री ऑपरेटर व MIS-Coordinator यांना APAAR आयडी तयार करण्याचे प्रशिक्षण देवून सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्याकरिता कळविण्यात आले आहे. प्रशिक्षण दरम्यान केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले सादरीकरण, व्हिडिओ, मार्गदर्शक सूचना अडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री नंबर, कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन प्रात्यक्षित करून दाखविण्यात आले आहे. पालकांकडून शाळास्तरावर उपलब्ध करून दिलेल्या संमती पत्रानुसार APAAR आयडी तयार करण्यात यावे.

याबाबत आपणास कळविण्यात येते की, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी शाळा स्तरावरून उपलब्ध करून

देण्याकरिता जिल्हा स्तरावर विशेष मोहिम राबविण्यात यावी. APAAR आयडी

संदर्भात केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा होत आहे. त्यामुळे सदर बाब प्राधान्याने

हाताळावी, ही विनंती.

APPAR ID शासन परिपत्रक येथे पहा Click here