बीड जिल्हयातील महत्वाची पर्यटन स्थळे tourist point for trip in beed district 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीड जिल्हयातील महत्वाची पर्यटन स्थळे tourist point for trip in beed district 

Table of Contents

नगद नारायण गड 

बीड पासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेले नारायण(धाकटी पंढरी) गड 18 व्या शतकातील संत जगद्गुरू नगद नारायण महाराज यांची समाधी व विठ्ठल रुख्मिणी मंदिर धाकटी पंढरी म्हणुन प्रसिध्द आहे तसेच गडाचा परीसर अतिशय नयन रम्य आहे तेथे कोणत्याही वेळी गेले तर थंड हवा उंच डोंगररांगा भव्य मंदीर कळस पाहायला मिळते गडाचे बांधकाम चिरे बंदी आहे बांधकामासाठी जास्तीत जास्त दगडाचा वापर केलेला आहे. गडावर दर महिन्याला एकादशी निमित्त यात्रा भरते 8 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी येतात आषाढी एकादशीला मोठी यात्रा असते ती यातरा 10 ते 15 दिवस चालते .

पिठी नायगाव मयुर अभयारण्य

हे बिड जिल्ह्यातील पाटोदा या तालुक्यात नायगाव मयुर अभयारण्य हे आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि नायगाव मयुर अभयारण्य हे यासाठी प्रसिद्ध आहे. बिड शहरापासून नायगाव हे अभयारण्य 25 कि. मी. अंतरावर नायगाव या परिसरात आहे. 1994 मध्ये शासनाकडून या अभयारण्यला मान्यता देण्यात आली. मयुर अभयारण्यामध्ये साधारणता 10 ते 12 हजार मोरांची संख्या आहे. या अभयारण्यात मोरांसोबत तरस, लांडगे, कोल्हे, रानससे, काळवीट, हरिण, मुंगुस असे अनेक अभयारण्य असे अनेक प्राणी आहेत.

ऐतिहासिक खंडोबाचे मंदिर-

खंडोबा हे मंदिर बिड जिल्ह्यातिल सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. हे मंदिर बिड जिल्ह्यापासून साधारणता 4 कि. मी. इतक्या अंतरावर आहे. बिड मधील पुर्वेकडील स्थीत असणाऱ्या टेकड्यामध्ये स्थीत असणारे हे मंदिर महादाजी शिंदे यांनी 18 व्या शतकात बांधले होते. खंडोबा मंदिर हे ठिकाण प्रत्येक स्थापत्य प्रेमासाठी आणि इतिहास प्रेमीसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे.

सौताडा धबधबा-

सौताडा धबधबा हा बिड मधील प्रमुख पर्यटन स्थानांपैकी एक आहे. सौताडा हा धबधबा बिड मधील विंचरणा नदीवरील प्रसिद्ध धबधबा असून हा धबधबा बिड मधील पाटोदा या तालुक्यात सौताडा गावात आहे. हा धबधबा 2 हजार ते अडीच हजार फुटावुन खाली झेपावतो. सौताडा धबधब्याच्या परिसरामध्ये भगवान रामेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. श्रावण महिन्यात मंदिराबरोबर धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. हा धबधबा बिड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील लोकांना आकर्षीत करणारे ठिकाण आहे. या दोन्ही जिल्ह्यात हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

बिंदुसरा धरण 

बिड शहरात असणारी बिंदुसरा ही नदी अनेक निसर्ग प्रेमिंसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. सुट्टीचा वेळ घालवण्यासाठी शनिवारी व रविवारी अनेक पर्यटक येथे येतात. बिंदुसरा या नदीवर बसुन वेगळ्याच प्रकारचा आनंद घेता येतो. बिड मधील बरेच पर्यटक सूर्योदयाच्या वेळी भरपूर गर्दी करतात. या नदीच्या जवळ असणाऱ्या बिंदुसरा या नदीला देखील तुम्ही भेट देऊ शकता.

हजरत शेहंशावली दर्गा-

हजरत शेहंशावली दर्गा हे 14 व्या शतकात मोहम्मद बिन तुघलक यांच्या काळात असलेले सुखी हजरत शेहंशावली यांना समर्पित आहे. बिड आणि बिडजवळ असलेल्या अनेक मुस्लिम पंथाचे हे धार्मिक स्थळ आहे. या दर्गाराची स्थापना 1840 मध्ये पर्यंत विविध काळात करण्यात आली होती. बिड शहरापासून ही दर्गा 10 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे 3 की. मी. अंतरावर आहे.

आद्यकवी मुकुंदराज महाराज समाधी 

मराठी साहित्य कवितेतील हे मुकुंदराच महाराज हे एक होते. योगेश्वरी या मंदिरापासून 5 कि. मी. अंतरावर आहे. अंबाजोगाई येथे मुकुंदराज महाराजांची समाधी आहे. मराठी भाषेतील पहिले पुस्तक विवेकसिंधु हे मुकुंदराज यांनी लिहिलेले आहे. हा अध्याय ग्रंथ त्यांनी बिड जिल्ह्यातील अंबाजोगाई या त्यांच्या राहत्या घरात लिहिला होता.

योगेश्वरी देवीचे मंदिर-

बिड जिल्ह्यातील अंबाजोगाई या तालुक्यात हे योगेश्वरी माता मंदिर आहे. साडेतीन सप्तपीठांपैकी वाणिज्य संतसखी ही देवी योगेश्वरी ही आदिमाया, आदिशक्तीने घेतलेले रुप आहे. हे अंबाजोगाई देवीजवळ विस्तृत आहे. योगेश्वरी हे एक शक्तिपीठ असल्याने या मंदिराला तिर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बिड शहरापासून हे मंदिर 95 कि. मी. अंतरावर आहे. 

धारुरचा भुईकोट किल्ला

बालाघाटच्या रांगांमध्ये वसलेला धारुर हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे. धारुर हा किल्ला भुईकोट., गडकोट आणि गिरीकोट प्रकारातील किल्ला आहे. या किल्ल्याचा एक भाग भुभाग आहे आणि बाकी भागामध्ये दार्या व डोंगर आहेत. दारुड हा किल्ला बिड शहरापासून 58 कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्रातील बरेच ऐतिहासिक वारसा जपणारे व जाणुन घेण्याची आवड आसणारे पर्यटन प्रेमी या किल्ल्याला भेट देतात खुपच प्रसिद्ध असे ठिकाण आहे.

परळी मधील वैजनाथ ज्योतीलिंग महादेव मंदीर 

परळी वैजनाथ मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परळी वैजनाथ हे बिड मधील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. परळी वैजनाथ या मंदिराचा ऐतिहासिक वारसा सांगतो की अहिल्यादेवी यांनी इ. स. 1700 च्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरात 12 महिने भक्तांची गर्दी असते. बिड शहरापासून हे मंदिर साधारण दीड किलो अंतरावर आहे. तर ही बिड जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे आपण बघितली आहे.

कंकालेश्वर महादेव मंदिर

बीड जिल्ह्यातील सर्वात जुने मंदिर हे कंकालेश्वर मंदिर आहे. हे मंदिर 84 मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधले होते. कंकालेश्वर हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. पाण्याच्या मधोमध बांधलेले हे मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना आकर्षित करते. या मंदिराच्या सभामंडपात दगडांनी बांधलेले खांब आणि अनेक प्राचीन प्रकारच्या मुर्त्या आहेत. या ठिकाणी गंगादेवी मंदिर, भवानी मंदिर, श्री राम मंदिर, विठ्ठल मंदिर, श्री कृष्ण मंदिर असे अनेक प्रकारचे मंदिरे पाहायला मिळतात.

कपिलधारा धबधबा 

।। श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी संजीवन समाधी (श्री क्षेत्र कपिलधार) ।।

बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण आणि प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक ठिकाण म्हणजे कपिलधारा येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी आहे यालाच श्री क्षेत्र कपिलधारा म्हणतात येथे सुंदर असे निसर्ग रम्य वातावरण आहे या ठिकाणी एक धबधबा आहे या धबधब्यला एक ऐतिहासिक वारसा आहे कथा आहे म्हणून हे ठिकाण महाराष्ट्र राज्य तर आहेच पण संपुर्ण देशात खुप प्रसिद्ध आहे येथे दर वर्षी याञा भरते लाखो भक्त स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत आसतात.

धाकली पंढरी नारायणगड कपिलधार, चाकरवाडी, त्वरित देवी तलवार, गोरक्षनाथ टेकडी नमलगाव गणपती,

रक्षसभुवन अशी अनेक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळे बिड जिल्ह्यामध्ये आहेत. अशा प्रकारे ही बिड जिल्ह्यातील 11 पर्यटन स्थळे आपण बघितली आहे.

सदर या जिल्ह्यातील सर्व माहितीसाठी आपण सोशल मीडियाचा वापर करु शकता आणि बीड जिल्ह्यातील विशेष सविस्तर आसा लेख लवकरच पुढील लेखात घेऊन येणार आहे आंबाजोगाई व इतर महत्वपूर्ण तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जाणुन घेणार आहोत बीड जिल्ह्याचे आधीच नाव काय होत बीड नाव कशावरून निर्माण झाल हे सर्व पाहणर आहोत.

बीड जिल्हा हा पर्यटन स्थळाबाबतीत तर प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यातील राजकारण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यात अनेक मोठे राजकारणी होऊन गेले. ऐतिहासिक स्थान खुप प्रसिद्ध आहेत जसे परळ वैजनाथ, खंडोबा मंदीर, कपीलधार असे अनेक ठिकाणे आहेत पण आपण काही विशेष ठिकाणांबद्द जाणुन घेतलो आहोत तर या जिल्ह्यविषयी अन्य काही महत्त्वपूर्ण अणि विशेष माहिती हवी असल्यास सोशल मीडियावर किंवा युट्यूब व जिल्ह्याच्या अधिकृत पेजवर जाऊन शोधु शकता युट्यूब हा उत्तम पर्याय आहे तुम्हाला सर्व अशी सविस्तर माहिती मिळुन जाईल.

Join Now