प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) साठी जिल्हास्तर प्रशिक्षणार्थीना उपस्थित राहणेसाठी आदेशित करणेबाबत tot training
संदर्भ :- मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे. जा.क्र राशेसंप्रपम/अविवि / SE/२०२५/०१२२/दि.१०.०१.२०२५ यांचे पत्र
उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण आयोजन परिषदे मार्फत करण्यात येत आहे. राज्यस्तर (TOT) प्रशिक्षण दिनांक २० ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न झाले आहे, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणाचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण हे इ.१ ली ते ५ वी तसेच इ. ६ वी ते ८ वी आणि इ. ९ वी ते १२ वी इयत्तांना शिकविणा-या सर्व शिक्षकासाठी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी स्वतंत्र असणार आहे. सदर प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत शिक्षण) २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४, शाळा गुणवत्त्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) क्षमताधारित मूल्यांकन संकल्पना व कार्यनीती, क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, क्षमताधारित प्रश्ननिर्मिती, उच्च विचारप्रवर्तक प्रश्न (HOT), अध्ययन निष्पतीनुसार प्रश्ननिर्मिती, समग्र प्रगतीपत्रक (HPC) संकल्पना व स्तरनिहाय स्वरूप, इत्यादी.
जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे (TOT) प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षणार्थीनी जिल्हास्तरीय प्रशिक्षणानंतर तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून कामकाज करावयाचे आहे. सदर प्रशिक्षणासाठी निवड केलेले प्रशिक्षणार्थी सोमवार दि.०३.०२.२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत उपस्थित राहणेसाठी कार्यमुक्त करणेबाबत आपले स्तरावरून संबंधीताना आदेशित करावे व ते उपस्थित राहतील याची खात्री करावी.
सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी विहित नियमानुसार देय प्रवास भत्ता PFMS प्रणालीव्दारे अदा करण्यात येईल. तसेच प्रशिक्षणार्थीना शालेय विषयांची पाठ्यपुस्तके घेवून
येण्याबाबत सूचित करावे.
प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणास येताना
१. आपल्या राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स प्रत
२. हवामान थंड असलेने उबदार कपडे आणवेत
३. स्वतःची औषधे
४. कार्यमुक्ती आदेश
५. कार्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड PAN कार्ड
प्रशिक्षणाबाबत शासनाच्या सर्व नियमाचे पालन करणे बंधनकारक असेल
सोबत :- प्रस्तुत जिल्हास्तर TOT करिता निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची तालुकानिहाय यादी