थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणेबाबत thakit payment deyak
संदर्भ- १) वेतन पथक, माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिअवेपना/आस्था/२०२४-२५/१२७२ दि. ३/६/२०२४.
२) वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिक्षण/वेतन व भ.नि.नि. पथक/२०२४- २५/१२७३ दि. ३/६/२०२४.
उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सद्यस्थितीत नियमित वेतन वगळता इतर देयकांचे टॅब शालार्थमध्ये बंद आहे. संदर्भ क्र. १ अन्वये वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांनी थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध
करून देण्याबाबत विनंती केलेली आहे. २. त्याअनुषंगाने लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२१९४८ या लेखाशीर्षाची पुरवणी देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.
३. तसेच २२०२०४४२ व २२०२०४७८ ची वैद्यकीय देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचप्रमाणे थकीत देयके ही बाब सेवा हमी कायद्याअंतर्गत येत असल्याने प्रस्तुत प्रकरणी तात्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.