सन 2024-25 थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन सादर करणेबाबत thakit online bill shalarth portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2024-25 थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन सादर करणेबाबत thakit online bill shalarth portal 

संदर्भ :- मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे प्राशिसं/अंदाज-203/थकीतशाओं/2024/6094 दिनांक : 12.09.2024

उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भाकित पत्रान्वये थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन पध्दतीनेच सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या

सूचना खालीलप्रमाणे आहेत. १] संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य तो तपासणी / पडताळणी करुन सदर दाव्यांना मंजूरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉगीन वरुन थकीत देयकाची माहिती भरावी. तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

आज अखेर ऑफलाईन सादर केलेल्या नवीन / पुर्नमान्यतेची तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत. सन 2024-25 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु कोषागारात सादर न केलेली देयके पुनश्च ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत.

प्रलंबित सर्व थकीत देयकाची माहिती दिलेल्या तारखेपर्यत शालार्थमध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील.

२] संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरिता या कार्यालयाकडे सादर करावीत.

तथापि, ऑन लाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.

१] थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तीक मान्यता / वरिष्ठ श्रेणी / न्यायालयीन आदेश / अनुदानाअभावि थकीत देयके इत्यादी)

२] उपरोक्त क्रमांक । च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

३] संचालनालय स्तरावरुन शासन निर्णय दिनांक 15/7/2017 मधील सूचनानुसार प्रशासकीय मंजूरी दिलेल्या दाव्यांची लेखाशीर्षानिहाय पुरवणी मागणी / पुनर्विनियोजन / सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्धतेबाबतचे मागणी प्रस्ताव प्रस्तावित करण्यात येईल.

थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशील खालीलप्रमाणे आहे.

देयकाचा प्रकार व आवश्यक कागदपत्रे –

1. पदोन्नती शिक्षणाधिकारी यांचा आदेश व लेखाधिकारी यांचे वेतननिश्चीती पडताळणी आदेश.

2. वेतनवाढ मुख्याध्यापकाचा आदेश.

3. निवडश्रेणी- शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश.

4. वरिष्ठ वेतनश्रेणी- लेखाधिकारी यांचे वेतन निश्चिती पडताळणी आदेश क्र. व दिर्नाक,

5. शिक्षण सेवक मानधन- शिक्षणाधिकारी / शिक्षण उपसंचालक मान्यता आदेश.

6. महागाई भत्ता फरक- शासन निर्णय / मुख्याध्यापक यांचे पत्र.

7. 6 वा / 7वा वेतन आयोग फरक मुख्याध्यापक यांचे पत्र.

8. निलंबन / बडतर्फ कालावधीतील फरक-

संस्था आदेश, देयक दुबार आहरित केले नसल्याबाबतचे मुख्याध्यापक यांचे हमीपत्र.

9. न्यायालयीन प्रकरणे-

विहीत नमुन्यातील न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्र, न्यायालयाचा निकाल, घटनाक्रम, याचिका दाखल केलेले प्रतिज्ञापत्र.

10. पवित्रद्वारे नियुक्ती असल्यास संस्थेचा आदेश व रुजू अहवालाची प्रत.

19. नियमित वेतनश्रेणी फरक शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक मान्यता व वेतननिश्चिती प्रत.

वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.

शासनास सादर करण्यात येणारी ०३ वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र-3 मध्ये सादर करावे. प्रस्तावासोबत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करावा.

डीडीओ-1 (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 25.9.2024 पर्वत सुविधा उपलब्ध राहील. त्यानंतर सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.

वरीलप्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार थकीत देयकांसाठी निधी उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन दिलेली कालमर्यादा पाळल्यास दिनांक 15/7/2017 च्या शासन निर्णयातील परिच्छेद 2 मधील सूचनांनुसार कार्यवाही करणे सोईचे होईल व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतूदी मधून नियमित वेतनाचा खर्च नियमितपणे भागविणे सुकर होईल. तसेच थकीत वेतनासाठी तरतूद उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करता येईल. वर नमूद कालमर्यादा सर्वच स्तरावर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सविरुद्र माहितीसाठी शालार्थमध्ये (User Manual) पहावे.